शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

कोल्हापूर जिल्ह्यातील खरीप क्षेत्र ४ हजारांनी कमी, ऊस १६ हजार हेक्टरने वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 1:07 PM

कडधान्याला दर नसल्याचा परिणाम : मान्सूनचे वेळेवर आगमन; शेतकऱ्यांची लगबग वाढली

कोल्हापूर : गेल्या पाच-सहा वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र हळूहळू कमी होऊ लागले आहे. खरिपात घेण्यात येणाऱ्या अन्नधान्य व कडधान्याच्या बेभरवशाच्या दरामुळे शेतकऱ्यांची मानसिकता बदलली आहे. त्या तुलनेत उसाला चांगला भाव मिळू लागल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र ४ हजार हेक्टरने कमी झाले, तर उसाचे क्षेत्र तब्बल १६ हजार हेक्टरने वाढले आहे.कोल्हापूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र हे ७ लाख ७६ हजार हेक्टर आहे. त्यापैकी ५ लाख ७ हजार हेक्टर हे लागवडीलायक आहे. निव्वळ पेरा क्षेत्र ४ लाख ७७ हजार हेक्टर आहे. खरीप हंगामात भात, ज्वारी, नागली, साेयाबीन, भुईमूग, तूर, मूग, उडीद ही पिके घेतली जातात. खरिपात सर्वाधिक भात पीक हे ९२ हजार हेक्टरवर घेतले जाते. त्यापाठोपाठ सोयाबीन, भुईमूग या तेलबियांचे उत्पादन घेतले जाते.मात्र, गेल्या दोन वर्षांत सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात घसरणीमुळे भुईमुगालाही अपेक्षित दर मिळाला नाही. त्या तुलनेत उसाला बऱ्यापैकी तेही एकरकमी दर मिळत असल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे.अक्षय तृतीया झाल्याने खरीप तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. त्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून वळीव पाऊस जोरदार कोसळत असल्याने मशागतीला मदत होत आहे. (पूर्वार्ध)

घरी खाण्यापुरता भात पिकविण्याकडे कलभाताचा उत्पादन खर्च आणि काढणीनंतर बाजारातील दर पाहता, शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. त्यामुळे अलीकडील चार-पाच वर्षांत घरी खाण्यापुरताच भात पिकविण्याकडे बहुतांशी शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

तुलनात्मक पीक क्षेत्रातील घट-वाढ हेक्टरमध्ये -

पीक             २०२२-२३                    २०२३-२४खरीप          १ लाख ९६ हजार ४६६  १ लाख ९२ हजार ६३६रब्बी            २२ हजार ७०                 २१ हजार ०७ऊस             १ लाख ७२ हजार ४६३  १ लाख ८८ हजार ४५९

गेल्या पाच वर्षांतील पर्जन्यमान मिली मीटरमध्ये असे-वर्ष                 पाऊस          टक्के२०१९             २३८८             १२८२०२०             १९४४             ९९२०२१             २११९             १२४२०२२             १९३२             ९८२०२३             ११०३             ५६

मान्सूनचे आगमन; पेरणी अशी करा..

यंदा मान्सूनचे आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार खरिपाच्या पेरणीचे नियोजन करावे. मध्यम खोल प्रमाणात भाताची धूळवाफ पेरणी, तर पाऊस सुरु झाल्यानंतर सोयाबीन, भुईमुगाची खोलवर पेरणी करावी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी