अनेक शेतकरी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ऐन पेरणीत त्यांना क्वारंटाईन व्हावे लागत आहे. या संकटालाही त्यांना सामोरे जावे लागत आहे.
तालुक्यात यंदा भात ६ हजार १०० हेक्टर, सोयाबीन ७ हजार ८०० हेक्टर, भुईमूग २ हजार ५०० हेक्टर,ज्वारी २५० हेक्टर,भाजीपाला तूर डाळ उडीद व इतर कडधान्य २हजार६००हेक्टर बांध-बंधिस्त,नांगरणी,रोटॅवेटर,सोयाबीन पेरणीसाठी सरी सोडणे आदी कामांना गती आली आहे.
दरम्यान, सध्या शेती सेवा केंद्रात भात, सोयाबीन बियाणे उपलब्ध झाली आहेत. भाताच्या शुभांगी, वायएसआर, अमानी या जातीच्या, तर सोयाबीन पेरणीसाठी ७२६,४४१, ३३५ जातीच्या बियाण्यांना अधिक प्रमाणात मागणी होत आहे.
"माणसाद्वारे किंवा बैलांच्या साह्याने करण्यात येणाऱ्या पेरणीपेक्षा टॅंकरने अधिक जलद आणि खोल पेरणी करता येते. भात, सोयाबीन, भुईमूग आदीची पेरणी एकाच यंत्राद्वारे करता येते. त्यामुळे हे पेरणीयंत्र बहुउपयोगी ठरत आहे.
भारत देवडकर,
युवा शेतकरी, म्हाकवे
कॅप्शन
म्हाकवे येथे टॅकरच्या साह्याने पेरणी करताना युवा शेतकरी भारत देवडकर.
(छाया-दत्तात्रय पाटील)