कोरोनामुळे गेली दोन वर्षे खासबाग कुस्ती मैदानात शड्डू घुमलेला नाही. कुस्ती नाही म्हणून तिकडे ढुंकूनही पाहायचे नाही ही प्रवृत्ती असल्याने आज या मैदानाला अवकळा आली आहे. महापालिकेच्या इस्टेट विभागाने दुरुस्तीचा व गवत कापणीचा ठेका देण्याची तसदीदेखील घेतलेली नसल्याने मैदानात जवळपास गवत दहा फुटांवर वाढले आहे. शाहू महाराजांनी ज्या उदात्त हेतूने खासबागची मुहूर्तमेढ रोवली, त्याची थोडीही जाण राहिली नसल्याने हा ऐतिहासिक ठेवा गवताच्या कुरणात परावर्तित झाला आहे.
१७०७२०२१-काेल-खासबाग ०१
फोटो ओळ : खासबाग मैदानातील मुख्य आखाड्यातही गवत दोन-तीन फुटांवर वाढले आहे.
(छाया : आदित्य वेल्हाळ)
१७०७२०२१-काेल-खासबाग ०२
खासबाग मैदानाचा मुख्य आखाडा आणि आजूबाजूची जागा पूर्णपणे उंच गवतांनी व्यापली असून यात ऐतिहासिक खासबागची इमारत व आखाडा पूर्णपणे झाकोळून गेला आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)
१७०७२०२१-काेल-खासबाग ०३
फोटो ओळ : खासबाग मैदानातील आजूबाजूच्या परिसरातील रोलिंगच्यावर गवत आले आहे.
(छाया : आदित्य वेल्हाळ)
१७०७२०२१-काेल-खासबाग ०४
फोटो ओळ : डोक्याच्यावर वाढलेल्या गवतामुळे खासबाग मैदानाचे सौंदर्यच संपले आहे.
(छाया : आदित्य वेल्हाळ )
१७०७२०२१-काेल-खासबाग ०५
फोटो ओळ : मैदानात मिरजकर तिकटीकडून वर जाणाऱ्या गेटच्या परिसरात तर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. कबुतरांनी केलेली घाणही स्वच्छ केली जात नसल्याने दुर्गंधी सुटली आहे.
(छाया : आदित्य वेल्हाळ)