शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

गुंड समीरचे आष्ट्यात अपहरण

By admin | Published: October 05, 2015 1:05 AM

पूर्ववैमनस्यातून पाचजणांचे कृत्य : खुनी हल्ला करून पळविले

आष्टा : येथील गुंड समीर मुस्तफा सय्यद ऊर्फ नायकवडी (वय २४, रा. वडगाव, जि. कोल्हापूर) याच्यावर पूर्ववैमनस्यातून पाचजणांनी धारदार शस्त्राने खुनीहल्ला केला. हल्ल्यानंतर गंभीर अवस्थेत मोटारसायकलवर बसवून त्याचे अपहरण केले. ही घटना आष्टा येथील गणपती मंदिरानजीक परीट गल्ली येथे शनिवारी रात्री पावणेदहाच्या दरम्यान घडली. आष्टा पोलिसात अमित सुरेश खंडागळे यांनी फिर्याद दिली आहे.आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीर नायकवडी याच्यावर खंडणी, बेकायदा हत्यार बाळगणे, मुलींची छेडछाड, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. तो आष्टा येथे राहत होता. सध्या तो वडगाव येथे वास्तव्यास आहे. अमित खंडागळे (रा. बिरोबा मंदिराजवळ, आष्टा) याच्याशी गेल्या ३ वर्षांपासून त्याची मैत्री आहे. डिसेंबर २०१३ मध्ये संग्राम मोरे, लखन हाबळे, शहेनशहा मुजावर, आकाश पवार यांनी एका मुलीच्या प्रकरणावरून नायकवडी यास मारहाण केली होती. फेबु्रवारी २०१४ मध्ये समीर यास मारहाण का केली, म्हणून विचारणा करतेवेळी जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर समीरचे या लोकांशी कायमचे वितुष्ट आले. शनिवारी सायंकाळी सातच्या दरम्यान समीर आष्टा येथे आला. अमित खंडागळे व समीर येथील एका पेट्रोल पंपानजीक चायनीज खात असताना, आश्रफ देसाई (रा. रामनगर, आष्टा) तेथे आला. त्याने समीरला शिवीगाळ केली. त्यानंतर समीरने त्याच्या श्रीमुखात लगावली. तेथून आश्रफ निघून गेला. समीरही निघून गेला. अमित तिथेच थांबला. हातगाडी विक्रेता सचिन रासकर याने, संग्राम मोरे व आकाश पवार यांच्यासह इतर मुले तुम्हास मारण्यासाठी शोधत आहेत, तुम्ही निघून जा, असे अमितला सांगितले. रात्री साडेनऊच्या दरम्यान जाणता राजा हॉटेलसमोर समीर नायकवडी व अमितची भेट झाली. अमितने माहिती समीरला दिली. त्यानंतर समीर त्यांना जाब विचारण्यासाठी निघून गेला. समीर गणपती मंदिरानजीक गेला. त्याचठिकाणी त्याच्यावर धारदार हत्याराने संग्राम मोरे, शहेनशहा मुजावर, आकाश पवार, आकाश वर्णे, धवल वग्याणी यांनी वार केले. तसेच दगडाने मारहाण केली. समीरला ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी अवस्थेत त्याला मोटारसायकलवर बसवून गणपती मंदिर, यल्लम्मादेवी रस्त्याने पळवून नेले. आष्टा पोलिसांना रात्री ११ च्या दरम्यान माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक पी. डी. पोमण, पोलीस उपनिरीक्षक जहॉँगीर शेख घटनास्थळी भेट दिली. समीरचा यल्लम्मादेवी रस्त्यासह शहर परिसरात शोध घेतला. सांगली, कोल्हापूर जिल्ह्णातील सर्व रुग्णालयांमध्ये चौकशी केली, कुठेही समीरवर उपचार सुरू असल्याचे समजले नाही. अमित खंडागळे याने, समीर यास धारदार शस्त्राने व दगडाने मारहाण करून गंभीर अवस्थेत वरील व्यक्तींनी मोटारसायकलवरून त्याला पळवून नेल्याची आष्टा पोलिसात वर्दी दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जहॉँगीर शेख करीत आहेत. (प्रतिनिधी)धागेदोरे नाहीत...आष्टा शहरात दिवसभर समीरचा खून झाल्याची जोरदार चर्चा होती. पोलिसांच्या श्वानपथकानेही तपास घेतला. मात्र, ते गणपती मंदिर परिसरातच घुटमळल्याने, अद्याप धागेदोरे हाती लागलेले नाहीत.