कोल्हापूर : पाच वर्षांपर्यंत लहान मुलांचा शारीरिक व मानसिक विकास होत असतो. या काळात मुले कृती, अनुभव व अवती-भोवती घडणाऱ्या गोष्टींचे अनुकरण करीत असतात. या काळात त्यांच्याकडे सर्वांत जास्त लक्ष दिले पाहिजे. मात्र, आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना त्यांच्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही. म्हणून मुलांचा परिपूर्ण विकास करण्यासाठी किड्झी प्री स्कूलची स्थापना झाली आहे, असे प्रतिपादन किडझीचे झोनल मॅनेजर लक्ष्मण मुदलीयार यांनी काल, शनिवारी केले. रेसिडेन्सी क्लब येथे ‘लोकमत’, झी लर्न-किड्झी यांनी संयुक्तपणे आयोजित ‘स्वयंम् संधी नव्या व्यवसायाची’ या कार्यक्रमात ते बोलत होते. मुदलीयार म्हणाले, भारतात पदवीचा स्तर वाढला आहे. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्त्व विकासाचा अभाव आहे. अनेक मुलांकडे नाममात्र पदव्या आहेत. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त काही विचारल्यास त्यांना उत्तर देता येत नाही. त्यामुळे ते स्पर्धेच्या युगात मागे पडत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांत काही वेगळे गुण असतात. त्याला चालना देण्यासाठीच किडझी प्री-स्कूलची स्थापना झाली आहे. या स्कूलमधून विद्यार्थ्यांना परिपूर्ण करण्याचे काम करत आहेत. किड्झी अन्य प्री स्कूलपेक्षा खूप वेगळी आहेत. इथे प्रत्येक मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षण दिले जाते. दृक्, श्राव्य आणि या दोन्ही माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थी परिपूर्ण बनतो. रिजनल सेल्स मॅनेजर सतीश माने म्हणाले, एखाद्या पालकांनी जर कोल्हापुरातील किड्झी प्री स्कूलमध्ये पाल्याला दाखल केले आणि त्यांची बदली मुंबईत झाली तर तिथे किडझी स्कूलमध्ये त्यांना प्रवेश दिला जातो. प्रत्येक आठवड्यांचा अभ्यास फिक्स असल्यामुळे अभ्यासक्रम बुडत नाही. किडझी प्री स्कूलची भारतात १३५० सेंटर आहेत. कोल्हापुरातही किडझी प्री स्कूलचे उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहेत. ही उपकेंद्र सुरू करण्यासाठी संस्थेतर्फे सर्वतोपरी मदत केली जाते. या ठिकाणी नियुक्त होणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचे विशेष ट्रेनिंग घेतले जाते. त्यामुळे बदलत्या शिक्षणप्रणालीमध्ये आपण सहभागी होऊन आपला आर्थिक स्तर वाढवावा, असे आवाहनही माने यांनी केले. शिक्षणतज्ज्ञ श्रीधर राव म्हणाले, पालक आपल्या मुलांवर आपले विचार लादतात हे चुकीचे आहे. मुलांना त्यांच्या आवडीनुसार विचार करण्याची संधी दिली पाहिजे. आधुनिक युगात मुलांनी पुस्तकी ज्ञानासोबत व्यवहारी ज्ञानही आत्मसात केले पाहिजे. यासाठी प्रथम पालकांनी त्यांच्या क्षमता ओळखल्या पाहिजेत. यावेळी किडझीचे कोल्हापुरातील उपकेद्रांचे बिझनेस पार्टनर नीलेश कदम व इचलकरंजी उपकेंद्राचे बिझनेस पार्टनर अनिलकुमार मालानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
मुलांना परिपूर्ण करण्यासाठी किड्झी प्री स्कूल उपयुक्त
By admin | Published: September 22, 2014 1:10 AM