कोल्हापूर : क लामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्यातर्फे आयोजित चौथ्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सात चित्रपट दाखविण्यात आले. क्रोशिएन दिग्दर्शक दाली बोरमाटनिक यांच्या ‘मदर आॅफ अस्फाल्ट’ या चित्रपटाने महोत्सवाचा समारोप करण्यात आला.दिग्दर्शक रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित ‘चॅप्लीन’ या चित्रपटातून चार्ली चॅप्लीनच्या वास्तव जीवनाचे दर्शन मांडण्यात आले आहे. सुबोध मुखर्जी दिग्दर्शित ‘मुनीमजी’ या १९५५ मधील संगीतप्रधान चित्रपटातून मानवी नातेसंबंधातील गुंतागुंत दाखविण्यात आली आहे. आपली थोरली बहीण जॅकीच्या मदतीने ६० वर्षीय जेन समुद्रकिनारी असलेल्या बस्तड या गावात टेनिस स्पर्धेच्या कालावधीत नाईट क्लब सुरू करावयाचे ठरवितो. यादरम्यान होणारा एक अपघात त्यांचे आयुष्य उलटेपालटे करून टाकतो आणि त्यातून सुटण्यासाठी त्याची केविलवाणी धडपड सुरू होते. हा संघर्ष दिग्दर्शक अॅलेक्स पीटरसनने ‘अवॉलॉन’मध्ये मांडला आहे. वरकरणी सोप्या, सहजसाध्य वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात मात्र तितक्या सोप्या नसतात, अशा प्लॉटवर दिग्दर्शक निकोला व्युकेविक यांचा ‘द किडस् फ्र ॉम मार्स अॅँड इगल्स स्ट्रीट’ हा चित्रपट आधारलेला आहे.तसेच मल्याळम दिग्दर्शक शाजी एन. करुण यांचा ‘स्वप्नम’ चित्रपट दाखविण्यात आला.
‘मदर आॅफ अस्फ ाल्ट’ने ‘किफ’चा समारोप
By admin | Published: December 25, 2015 11:36 PM