शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
2
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
4
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
5
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
6
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
7
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
8
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
9
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
14
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
19
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
20
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

कोल्हापुरात सराफाचे अपहरण करून खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:46 AM

कोल्हापूर : पत्नीला फेसबुकवर फें्रड रिक्वेस्ट पाठविल्याच्या संशयावरून सराफाचे अपहरण करून खुनी हल्ला करण्यात आला. सिद्धार्थ संतोष परमार (वय ...

कोल्हापूर : पत्नीला फेसबुकवर फें्रड रिक्वेस्ट पाठविल्याच्या संशयावरून सराफाचे अपहरण करून खुनी हल्ला करण्यात आला. सिद्धार्थ संतोष परमार (वय २६, रा. सी वॉर्ड, गुजरी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी संशयित टिन्नू ऊर्फ दिग्विजय पवार (रा. ताराबाई पार्क), त्याचा दाजी मंदार व अनोळखी दोन साथीदार यांच्यावर रविवारी गुन्हा दाखल केला. संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.पोलिसांनी सांगितले, सिद्धार्थ परमार यांचा गुजरी येथे सराफी व्यवसाय आहे. ते काही मित्रांसोबत शनिवारी (दि. २७) रात्री कावळा नाका परिसरातील एका आलिशान हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण करून घरी येत असताना शिवाजी पार्क, गद्रे उद्यानाजवळ, संशयित टिन्नू पवार व त्याच्या साथीदारांनी त्यांना अडविले. टिन्नू याने ‘माझ्या बायकोला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट टाकून तू तिच्याशी का बोलतोस?’ अशी विचारणा करून सराफ सिद्धार्थ परमार यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या मित्रांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता ‘तुम्ही मध्ये पडू नका, नाहीतर तुम्हालाही सोडणार नाही,’ अशी धमकी दिली. परमार यांना हॉकी स्टिक व लाकडी दांडक्याने डोक्यात, पाठीवर, पायावर, हातावर जबर मारहाण केली. त्यानंतर कॉलरला धरून जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून शिवाजी पूल येथील पिकनिक पॉइंट येथे नेऊन पुन्हा मारहाण केली. त्यानंतर त्यांना तिथेच टाकून ते पसार झाले. सिद्धार्थ यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली होती. त्यांनी मोबाईलवरून नातेवाइकांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना कदमवाडी येथील रुग्णालयात दाखल केले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिवाजी पार्क आणि शिवाजी पुतळा या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत. संशयित राहत असलेल्या ताराबाई पार्क येथील घरामध्ये झडती घेतली असता तो साथीदारांसह पसार झाला आहे. त्याचा मोबाईलही बंद आहे. पोलीस त्याच्या शोधात असून लवकरच त्याच्या मुसक्या आवळू, असे मोरे यांनी सांगितले. गुन्ह्यामध्ये वापरलेली कारही जप्त केली जाणार आहे.संशयातून मारहाण : जखमीची जबाबसहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी जखमी सिध्दार्थ परमार याची रुग्णालयात जावून विचारपूस केली. यावेळी त्याने आपला मोबाईल निकम यांच्याकडे देऊन चौकशी करा, मी तशी काही फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली नसल्याचे सांगितले. संशयित टिन्नु पवार हा मित्र आहे. त्याच्या पत्नीची आणि मुलीची एकदा भेट झाली होती. त्यातून फक्त ओळख होती. संशयातून त्याने मारहाण केल्याचा जबाब दिला आहे.जबर मारहाणसिध्दार्थच्या हातावर, पाठिवर, पायावर संशयितांनी जबर मारहाण केली आहे. संपूर्ण अंगावर मारहाणीचे वळ उठुन सुज आली आहे. या मारहाणीमुळे त्याला ºहदयविकाराचा धक्काही आला आहे.