कोल्हापूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) आणि तासवडे (जि. सातारा) येथील टोलनाक्यावरील पथकरात येत्या गुरुवार (दि. १ जुलै) पासून वाढ झाली आहे. कमीत कमी ५ आणि अधिकाधिक ४५ रुपयांपर्यंत पथकरात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये ट्रक आणि बसच्या पथकरात जास्त वाढ झाली आहे.
केंद्र सरकारने पुणे-बेंगलोर महामार्ग बांधा, वापरा, हस्तांतर करा या तत्त्वावर तयार केला. यातील कागल ते सातारापर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे. सन २००५ पासून या रस्त्यावरील किणी, तासवडे टोलवरील पथकर वसुली महामंडळाकडून केली जाते. महामंडळाकडून १ जुलै २०२१ पासून नवे पथकर लागू केले आहेत. किणी आणि तासवडे टोलनाक्यावर मोटर कार, पॅसेंजर व्हॅन, जीपसाठी वनवेसाठी ७५ रुपयांवरून ८० रुपये करण्यात आले आहे. हलक्या मालवाहतूक वाहनांना १३५ रुपयांवरून १४५ रुपये, ट्रक, बस अवजड वाहनांसाठी २६५ वरून २९० अशी पथकरात वाढ झाली आहे.
चौकट
नवे दर असे : (कंसात जुने दर)
कार, जीप : ८० (७५)
हलके मालवाहतूक वाहने : १४५ (१३५)
ट्रक : २९० (२६५)
बस : २९० (२६५)
कोट
किणी, तासवडे टोलनाक्यावरील पथकरात वाढ करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी १ जुलैपासून होईल.
-व्ही. डी. पंंधारकर, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण