सैनिक हे या देशातील सर्वात श्रेष्ठ, सन्मानाचं, महत्त्वाचं आणि जबाबदारीचं पद. कित्येक तरुणाचं सैनिक बनून देशाचं रक्षण करावं, असं स्वप्न असत. मात्र, सैन्यात जाण्यासाठी शारीरिक चाचणी महत्त्वाची असते यासाठी किणी (ता. चंदगड) येथील तरुणांनी एकत्र येऊन स्व:खर्चाने धावपट्टीची मैदाने तयार करून कार्यात भागात आदर्श निर्माण केला आहे.
अनेक तरुण सैन्यात जाण्याची स्वप्ने पाहतात. आपली स्वप्ने आपणच पूर्ण करूया यासाठी सर्व तरुणांनी एकत्र येऊन गावातील गौळटेकडीवरती स्व:खर्चाने मैदाने तयार केली आहेत. ट्रॅक्टरच्या सहाय्याने माती आणून ४०० मीटरची धावपट्टी तयार केली आहे.
जास्तीत जास्त तरुण सैन्यात भरती होऊ दे यासाठी तरुणांना यश मिळवू दे असे, शिवछत्रपती पुरस्कार व राष्ट्रीय खेळाडू चंद्रकांत मनवाडकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
याकामी महेश जोशिलकर, प्रणित नांदूडकर, राहुल आडाव, कृष्णा बिर्जे व तरुणांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी : किणी (ता. चंदगड) येथे धावपट्टी तयार करण्यासाठी श्रमदान करणारे तरुण.
क्रमांक : ०९०७२०२१-गड-०४