शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
4
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
5
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
9
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
10
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
11
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
12
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
13
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
14
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
15
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
16
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
17
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
18
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
19
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
20
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!

मंत्री हसन मुश्रीफांवर कारवाई होणार?, सोमय्या आयकर विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 1:50 PM

सोमय्यांनी आपला मोर्चा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांच्याकडे वळवला आहे. त्यांनी ट्विट करत मुश्रीफ यांचाविरोधात आता कारवाईचे संकेत दिले आहेत.

कोल्हापूर : मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीत पोहचल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांचा दौरा चांगलाच गाजला. यानंतर आता पुन्हा एकदा सोमय्यांनी आपला मोर्चा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांच्याकडे वळवला आहे. सोमय्यांनी ट्विट करत मुश्रीफ यांचाविरोधात आता कारवाईचे संकेत दिले आहेत. सोमय्या आज, शुक्रवारी  (दि. ०१) पुण्यात मुश्रीफ यांच्या विरोधात आयकर विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे यानंतर मुश्रीफांवर काय कारवाई होणार हे पाहावे लागणार आहे.सोमय्या यांनी हसन मुश्रीफ कुटुंब आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याविरोधात केंद्र सरकारने पुणे न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली आहे. त्यात फसवणूक, शेल कॉससाठी कलम ४४७ आणि ४३९ कंपनी कायदा आणि तपास IPC/CRPC कलम २५६ अन्वये कारवाईची विनंती केली आहे. पुढील काही दिवसांत यावर सुनावणी होणार आहे. सोमय्या यांनी ट्विट करून आपल्या पुणे दौर्‍याविषयी माहिती दिली आहे. आपण शुक्रवारी पुण्यात जाणार असून, आयकर विभागाच्या अधिकार्‍यांच्या भेटीत १५८ कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणी कागदपत्रे देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याविरोधात घोटाळ्याचे आरोप केले. तर या कारखान्याची पाहणी करण्यासाठी ते कोल्हापूरला आले असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी सोमय्यांना विरोध केला होता. आज पुन्हा सोमय्यांनी मुश्रीफांच्याकडे मोर्चा वळवल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात रान उठवले आहे. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, शिवसेनेचे नेते अनिल परब, प्रताप सरनाईक यांना घेरले आहे. यातील देशमुख आणि मलिक सध्या कोठडीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPuneपुणेHasan Mushrifहसन मुश्रीफKirit Somaiyaकिरीट सोमय्याIncome Taxइन्कम टॅक्स