कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफांच्या घोटाळा प्रकरणाची माहिती घेण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे आज गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान त्यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेत जात बँकेचे सीईओ डाँ. ए. बी माने, व्यवस्थापक आर. जे पाटील यांची भेट घेतली. या भेटीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.आमदार हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे साखर कारखाना व गडहिंग्लज येथील अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना (ब्राक्स) येथे घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर ‘ईडी’ने छापे टाकले होते. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. वातावरण शांतएकूणच ईडीने केलेली कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची चीड आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सोमय्या कोल्हापुरात येत असल्याने वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता होती. मात्र मुश्रीफांनी केलेल्या आवाहनामुळे कार्यकर्त्यांमध्ये शांतता दिसून आली.सोमय्यांचे स्वागत, कार्यकर्त्यांनी शांतता राखावी - हसन मुश्रीफ माजी खासदार किरीट सोमय्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाला भेट देणार असल्याने या भेटीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले आहे. यापूर्वीच मी त्यांना आवाहन केले आहे की, तुम्ही बँकेत या आणि तुम्हाला जी-जी माहिती हवी असेल ती घ्या. कदाचित; त्यानुसार ते येत असावेत. असे मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.बँकेच्या अधिकाऱ्यांची तब्बल ३० तास चौकशीकाही दिवसापुर्वीच ईडीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर छापेमारी करत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून तब्बल ३० तास ‘ब्रिक्स’ व ‘ संताजी घोरपडे’ साखर कारखान्याशी संबंधित सर्व व्यवहारांची कसून चौकशी केली होती.
किरीट सोमय्या कोल्हापूर जिल्हा बँकेत दाखल; सीईओ, व्यवस्थापकांची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 1:10 PM