कोल्हापूर : करवीरनिवासीनी श्री अंबाबाई मंदिरात उत्तरायण कालखंडातील किरणोत्सव सोहळ्यास तीन दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. त्याच्या तिसऱ्या दिवशी व सलग दुसऱ्या दिवशी आज, सोमवारी मावळतीची किरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर पोहचली. आजच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ३२ मिनिटांनी मावळतीची किरणे महाद्वार कमानीतून आत आली. त्यानंतर गरूड मंडप, गणपती चौक, कासव चौक, पितळी उंबरठा, चांदीचा उंबरठा, गर्भकुटी, चरणस्पर्श, चेहरा आणि दोन मिनटे स्थिरावून किरणे किरिटावर पोहचून ६ वाजून १८ मिनिटांनी डावीकडून लुप्त झाली.
सलग दोन दिवस स्वच्छ वातावरण आणि किरणोत्सव मार्गात येणारे सर्व अडथळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने महापालिकेच्या सहकार्याने दुर केली. यंदा दोन वेळा पुर्ण किरणोत्सव झाल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.