मूळचे कर्नाटकातील असणारे हिरासकर नोकरीच्या निमित्ताने कोल्हापुरात स्थायिक झाले. ते राजारामपुरीतील आईच्या पुतळ्याशेजारी वास्तव्यास होते. केआयटीच्या सिव्हील विभाग उभारणीत त्यांचे योगदान होते. या विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या हिरासकर यांनी सुरूवातीच्या टप्प्यात अंबाबाई मंदिरात वाढणाऱ्या तापमानाचा अभ्यास केला. प्रदक्षिणा मार्गावर दगडी भिंतींना मार्बल लावल्यामुळे ही उष्णता वाढत असल्याचा अहवाल त्यांनी देवस्थान समितीला सादर केला होता. त्यानुसार हे मार्बल काढण्यात आल्यानंतर या ठिकाणी नैसर्गिक गारवा निर्माण होण्यास मदत झाली. त्यानंतर त्यांनी सहकारी प्रा. शीतल वरूर यांच्या सहकार्याने अंबाबाईच्या किरणोत्सवामध्ये येत असलेल्या अडथळ्याचा अभ्यास सुरू केला. यासाठी त्यांनी रंकाळ्याकडील पाच किलोमीटरपर्यंतच्या परिसरातील इमारतींचा अभ्यास केला आणि अडथळ्यांची यादी महापालिकेला सादर केली. त्यानुसार महापालिकेने कारवाईला सुरुवात केली.
१६०२२०२१ कोल किशोर हिरासकर निधन