कोल्हापूर : केएमटीच्या बस आता बायो सीएनजीवर धावणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर एक बसचे इंजिन सीएनजीप्रमाणे करण्यात येत आहे. संबंधित कंपनीसोबत करार केला असून, सोमवारी एका बसचे इंजिन गॅस रूपांतरित करण्यासाठी देण्यात आले.बायो सीएनजी रूपांतरित करण्यासाठी एक बस संबंधित कंपनीकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते करण्यात आली. इंधन खर्चामध्ये बचत आणि पर्यावरण संवर्धन असा दुहेरी फायदा होणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास अन्य बसेस रूपांतरित करण्यात येणार आहेत.
यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा उत्तुरे, परिवहन समिती सदस्य अशोक जाधव, शेखर कुसाळे, चंद्रकांत सूर्यवंशी, महेश वासुदेव, यशवंत शिंदे, नामदेव नागटिळे, संदीप सरनाईक, प्रसाद उगवे उपस्थित होते.प्रवाशांच्या मनोरंजनासाठी बसमध्ये एलईडी टीव्हीजाहिरातीद्वारे उत्पन्नाचे स्रोत निर्माण व्हावेत यासाठी एलईडी टीव्हीद्वारे प्रवाशांचे मनोरंजन करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दोन बसेसमध्ये एलईडी टीव्ही बसविण्यात आले. परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांच्या संकल्पनेतून बायो सीएनजी आणि एलईडी टीव्ही हे दोन्ही उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. केएमटीचा तोटा कमी करून फायदा कसा होईल, यासाठी हे प्रकल्प सुरू केले जात आहेत.प्रशिक्षण केंद्रास सुभाष देसाईंचे नावयंत्रशाळेमधील कर्मचारी प्रशिक्षणगृहास माजी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक आणि मोटार वाहन निरीक्षक सुभाषचंद्र नारायण देसाई यांचे नाव देण्यात आले. सुभाषचंद्र नारायण देसाई के.एम.टी. प्रशिक्षण केंद्र असे नामकरण महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.