कोल्हापूर : महापालिकेच्या परिवहन विभागाच्या (केएमटी) सील केलेल्या खात्यातील प्रतिदिन सुमारे दहा लाख रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.केएमटी प्रशासनाने सुमारे ४ कोटी १४ लाख रुपये इतकी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्या कार्यालयाकडे जमा केली नाही. याबाबत कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या होत्या. ही रक्कम तातडीने भरावी यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून केएमटी प्रशासनाला यापूर्वी वेळोवेळी नोटीस बजावली होती; पण त्याची केएमटी प्रशासनाने दखल घेतली नाही. केएमटी प्रशासनाकडून प्रतिदिन सरासरी आठ लाख रुपयांचा भरणा होत आहे. दरम्यान उद्या, सोमवारी भविष्य निर्वाह कार्यालयाकडे थकीत रकमेपैकी सुमारे २० लाख रुपये भरण्याचे लेखी हमीपत्र केएमटी प्रशासनाने दिले. त्यामुळे आयडीबीआय बँकेतून प्रतिदिन एक लाख रुपये, तर बँक आॅफ इंडिया शाखेतून प्रतिदिन नऊ लाख रुपये काढण्याची मुभा देण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले यांनी दिली. (प्रतिनिधी) बुधवारी (दि. १३) यामुळे दुपारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने ‘केएमटी’ची बँक आॅफ इंडिया आणि आयडीबीआय या दोन बँकांत असणारी खाती सील करण्याची कारवाई केली होती.
‘केएमटी’ला खात्यातून १० लाख काढण्याची मुभा
By admin | Published: July 17, 2016 12:40 AM