शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

केएमटीला प्रशासन, कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 2:40 PM

Muncipal Corporation Mla Kolhapur- प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे केएमटीला फटका बसत आहे, अशा शब्दात आमदार चंद्रकांत जाधव यांनी सुनावले. दर पगारावेळी महापालिकेवर आवलंबून राहू नका, एप्रिलपासून केएमटी स्वावलंबी करा, असे आदेशही त्यांनी दिले. शुक्रवारी त्यांनी महापालिकेच्या केएमटी वर्कशॉपमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. प्रशासक कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर यांची प्रमुख उपस्थित होती.

ठळक मुद्देआमदार चंद्रकांत जाधव यांनी सुनावले एक एप्रिलपर्यंत केएमटी स्वावलंबी करण्याचे आदेश

कोल्हापूर : प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे केएमटीला फटका बसत आहे, अशा शब्दात आमदार चंद्रकांत जाधव यांनी सुनावले. दर पगारावेळी महापालिकेवर आवलंबून राहू नका, एप्रिलपासून केएमटी स्वावलंबी करा, असे आदेशही त्यांनी दिले. शुक्रवारी त्यांनी महापालिकेच्या केएमटी वर्कशॉपमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. प्रशासक कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर यांची प्रमुख उपस्थित होती.आमदार जाधव म्हणाले, केएमटीतील कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी दरवेळी महापालिकेवर अवलंबून रहावे लागते, ही खेदाची बाब आहे. केएमटीचा येणारा सर्व खर्च मिळणाऱ्या उत्पन्नातूनच भागला पाहिजे. केएमटीने यासाठी उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. काही बस रिकाम्याच जाताना दिसतात.

यासाठी तोट्यातील मार्ग बंद केले पाहिजेत. काही बसेसच्या वेळेत बदल केले पाहिजेत. पर्यटकांसाठी विशेष बससेवा सुरू करा. यावेळी माजी स्थायी सभापती सचिन पाटील, गटनेता शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक विनायक फाळके, अनिल कदम, उपायुक्त रविकांत आडसूळ, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक चेतन कोंडे आदी उपस्थित होते.कचऱ्यापासून गॅस करून केएमटीसाठी वापराकेएमटीच्या सर्व बसेस सीएनजी गॅसवर केल्यास तोटा कमी होऊन फायदा होईल. शहरातील कचय्रांवर प्रक्रिया करुन सीएनजी गॅस निर्मिती करून त्याचा वापर केएमटीसाठी करणे शक्य आहे. प्रशासनाने यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना जाधव यांनी केली.फोटो : २९०१२०२१ आमदार जाधव न्यूज 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMLAआमदारkolhapurकोल्हापूर