शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

केएमटीचा ‘गाडा’ तोट्यातच!

By admin | Published: June 16, 2016 12:29 AM

नव्या बसेसना वर्ष पूर्ण : दररोज दोन लाखांच्या उत्पन्नाला फटका

तानाजी पोवार --कोल्हापूर --जुन्या बसेसवर वारंवार होणारा दुरुस्ती खर्च हा आवाक्याबाहेर गेल्याने नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्यास ‘केएमटी’चा तोटा कमी होऊन महापालिकेच्या परिवहन विभागाला ऊर्जितावस्था येईल, अशी अपेक्षा फोल ठरली आहे; नव्या ७५ बसेस ताफ्यात येऊन सुमारे वर्ष उलटले तरीही प्रतिदिनी तोटा वाढतच आहे. त्यामुळे केएमटीला पहिल्यापेक्षा जादा घरघर लागली आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रतिदिनी सुमारे दोन लाख रुपये तोट्याला सामोरे जावे लागत असल्यामुळे त्याचा परिणाम केएमटी कर्मचाऱ्यांच्या पगारावर होऊ लागला आहे.दोन वर्षांपूर्वी केएमटी प्रशासनाने काही बसेस भाडेपट्टीवर घेऊन या उपक्रमाला चालना देण्याचा प्रयत्न केला; पण त्यामुळे केएमटीच्या तोट्यात फरक पडला नाही. जुन्या बसेसच्या दुरुस्तीवर येणारा खर्च आणि डिझेलचा खर्च परिवहन विभागाला परवडेना झाला. त्यामुळे प्रतिदिनी सुमारे दीड लाख रुपयांचा तोटा होत होता. नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्यास दुरुस्तीवरील खर्च कमी होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने केली. त्यामुळे पूर्वीच्या १०० बसेसपैकी सुमारे ५१ बसेस स्क्रॅप केल्या. मे २०१६ मध्ये नव्या ७५ बसेसची भर पडली. नव्या बसेसमुळे मागील वर्षाच्या तुलनेत तोटा किमान ५० हजारांनी कमी झाला; पण सध्या एकूण १२९ बसेसपैकी सुमारे ११० बसेस धावत आहेत. नव्या बसेस येऊन वर्ष लोटले तरीही तोटा कमी होण्यापेक्षा वाढतच आहे.सध्या केएमटीपासून प्रतिदिन सुमारे सात लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर उत्पन्नात भर पडेल, अशी अपेक्षा असून ते उत्पन्न पुढील महिन्यात प्रतिदिनी आठ लाख रुपयांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे; पण किमान साडेनऊ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न पोहोचले तर केएमटी नफ्यात येईल, असाही विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नव्या २९ बसेस ताफ्यात येणारगतवर्षी काही तांत्रिक कारणांस्तव राहिलेल्या सुमारे २९ बसेस लवकरच ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून येणाऱ्या निधीतून या बसेस खरेदी करण्यात येत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या १२९ व नव्या येणाऱ्या २९ बसेसमुळे ही संख्या एकूण १५८ होणार आहे.