कोल्हापूर : कोरोनाच्या भीषण संकटामुळे शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण कोडोलीकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. कोडोलीकर यांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, फोन करून, सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या.
ईदनिमित्त विचारे माळ परिसरातील मुस्लिम बांधवांना खिरीच्या साहित्याचे वाटप प्रकल्प अधिकारी निवेदिता कारीदकर आणि योगिता कोडोलीकर यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम विराज सुतार, राजेंद्र बनसोडे, नितीन आर्य, रवी इनामदार, सचिन राणे, सागर गायकवाड, सुनील येडगे व विचारेमाळ मित्रमंडळाने आयोजित केला.
मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन महापालिकेचे सहायक आयुक्त विनायक औंधकर व शाहीर आझाद नायकवडी, किशोर माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले. सुमारे ८० जणांनी रक्तदान केले. मराठा ऑर्गनायझेशनचे ऋतुराज माने, राजवर्धन बिंराजे,अभिजित पोर्लेकर, बीना देशमुख, ऋतुजा देसाई, वैदेही पाटील इतर सहकाऱ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.
आझाद नायकवडी लोककला फाउंडेशन व महेश सोनुले यांच्या अलंकार कला अकादमीतर्फे १५ कलावंतांना महिनाभर पुरेल इतका शिधा वाटप करण्यात आला.
जिल्हा युवासेनेचे अध्यक्ष मंजीत माने, मनसेचे मंदार पाटील, अभिजित राऊत,वैभव जाधव,शेखर बारटक्के यांच्या वतीने सीपीआर येथील डॉक्टर्सना पीपीई किट बंटी सावंत व डॉ. व्यंकटेश पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. पंचगंगा स्मशानभूमीसाठी साक्षी पन्हाळकर यांच्या जिजाऊ फाउंडेशन व आराध्या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अडीच हजार शेणी दान करण्यात आल्या.
ऐश्वर्या मुनिश्वर यांच्या सेवा निलायम संस्थेच्या वतीने दोनशे निराधार, गरजू आणि फिरस्त्या लोकांना कोडोलीकर यांच्या हस्ते भोजन वाटप करण्यात आले.
फोटो : १५०५२०२१-कोल-कोडोलीकर न्यूज
कोल्हापुरातील प्रवीण कोडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी प्लाझादान शिबिर घेण्यात आले. त्यास चांगला प्रतिसाद लाभला.