शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोकणचा ‘वाटाड्या’ कुंभार्ली घाट

By admin | Updated: July 20, 2014 22:47 IST

सोनपात्राने दाखविली वाट : कोकण-पश्चिम महाराष्ट्राचा समन्वयक; धबधब्याची पर्वणी

सुभाष कदम -चिपळूणकाळ्याकभिन्न सह्याद्रीच्या कड्यावर आता पावसाळ्यात हिरवी शाल पांघरली आहे. उंचच उंच कडे आणि त्यातून फेसाळणारे धबधबे म्हणजे शंकराच्या जटेतून वाहणारी गंगाच! कुंभार्ली घाटाला ऐतिहासिक महत्त्व आहे. पावसाळ्यात हा घाट पर्यटकांसाठी नयन मनोहारी पर्वणी घेऊन येतो. या घाटाचे वैभव काही औरच आहे. चिपळूण - कऱ्हाड मार्गावर वसलेला कुंभार्ली घाट हा अवघड घाट म्हणून गणला जातो. या घाटातून कोकणात उतरण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांना सोनपात्राने वाट दाखविली होती. पुढे काळ बदलत गेला आणि हा गुहागर-विजापूर रस्ता अस्तित्त्वात आला. पूर्वी घाटावरचा माल बैलगाडीच्या माध्यमातून गोवळकोट बंदरात येत असे व येथून मंगलोरी कौले, मासे, भात किंवा अन्य सामान घेऊन गाड्या परत घाटावर जात असत. दळणवळणाचे मुख्य केंद्र म्हणून त्याकाळी कुंभार्ली घाट रस्ता गणला जायचा. चिपळूण ही मोठी बाजारपेठ होती. येथील गाडीतळ व इतर खुणा आजही अस्तित्त्वात आहेत. चिपळूण व पश्चिम महाराष्ट्र यांच्यामध्ये पूर्वी देवाणघेवाण चालत असे. यासाठी या घाटाचा प्रामुख्याने उपयोग केला जात असे. आज काळ बदलला. आधुनिकीकरणाच्या झपाट्यात घाटाचीही मोठी हानी झाली. अनेकवेळा येथील काळा कातळ कापला जातो. त्यामुळे पावसाळ्यात येथून प्रवास करणे अवघड बनले आहे. उंचच उंच टेकड्या त्यावर पडणारा पाऊस व पाऊस थांबल्यावर घाटात पसणाऱ्या धुक्याचे साम्राज्य प्रवाशाला खिळवून ठेवते. वर ढगाळलेले आकाश व सभोवताली धुक्याची चादर लपेटून पर्यटक व प्रवासी प्रवास करीत असतात. हा क्षण अनमोल असतो. अनेकवेळा घाटात मुसळधार पावसाचा आस्वाद घेता येतो. त्यामुळे या घाटात आता पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. घाटातील नयनरम्य दृश्य, फेसाळणारे धबधबे, विविध फुलणारी रानफुले, त्यावर भिरभिरणारी फुलपाखरे पर्यटकांचे मन आकर्षूण घेतात. सोनपात्राचे मंदिर...कुंभार्ली घाटाच्या मध्यावर असलेल्या अवघड अशा यु टर्नवर सोनपात्राचे मंदिर आहे. घाटावरुन खाली येताना किंवा घाट चढून गेल्यावर अनेक खासगी गाड्या येथे सोनपात्राच्या मंदिरात दर्शनासाठी थांबतात. सोनपात्रा नावाच्या धनगर बांधवाने ब्रिटिश अधिकाऱ्यांना या रस्त्याची वाट दाखविली होती. याची एक आख्यायिका आहे. त्यामुळे या घाटात सोनपात्राला अधिक महत्त्व आहे. या घाटाच्या जडणघडणीत सोनपात्राचे मोठे योगदान आहे. ----कुंभार्ली घाट चढताना घाटाच्या मध्यभागी गेल्यावर वानरांचा कळप आपल्या कुटुंबकबिल्यासह उत्साहात फिरताना प्रवाशांच्या नजरेस पडतो. लहान पिलू उराशी बाळगून वानरीन बिनधास्त उड्या घेत असते. या मर्कटलिला पर्यटकांचे व प्रवाशांचे मनोरंजन करतात. अनेक प्रवासी व पर्यटक या वानरांना खाऊ घालत असल्याने ते येथेच विसावतात. ---पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांच्यातील समन्वयाचा, संस्कारांचा, दळणवळणाचा व व्यापाराचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरलेला हा घाट अनेक वळणे घेऊन कोयना मार्गाचे दर्शन घडवतो. निर्धोक, सुरक्षित व सर्वांना हवाहवासा वाटणारा असा हा घाट पावसाळ्यात तेथील नितांत सुंदर वैभवाने अधिकच खुलतो. सर्वांना हवाहवासा करतो. सध्या या भागात येणारे व या भागातून घाटावर जाणाऱ्यांसाठी हे लेणं ठरले आहे.----कुंभार्ली घाटात आता पावसाळ्यात अनेक ठिकाणी लहान मोठे धबधबे कड्याकपारीतून फेसाळत उड्या घेत आहेत. पाण्याचे झरे मुक्तपणे खळखळाट करीत वाहात आहेत. आजूबाजूला असणारी हिरवी वनसंपदा पाहिली की मन हरखून जाते. क्षणभर मन भिरभिरते आणि इथे थबकते. निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार पाहतानाच समोर पश्चिमेकडे दिसणारे पिवळे ऊन अस्तित्त्वाची जाणीव करुन देते. कुंभार्ली घाट विविध नयनरम्य नैसर्गिक स्थळांनी अनेकांच्या मनात रूंजी घालतो. हा घाट निसर्गाचे लेणं असल्याने येथील धबधबे पाहण्यासाठी अनेक पर्यटक दरवर्षी हमखास हजेरी लावतात. हा आनंद लुटण्यासाठी तरूणाई मोठ्या संख्येने येत असते. या सर्वांनाच धबधब्यांचे अप्रूप कायम आहे.