कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत शहरातील २६ कुटुंबांकडील साचलेल्या पाण्यामध्ये डासअळ्या आढळून आल्या.
नागाळा पार्क, ताराबाई पार्क, डी मार्ट रोड, सासने ग्राउंड, बेपारी गल्ली, जंगली गल्ली, निंबाळकर माळ, श्रीराम कॉलनी कसबा बावडा, प्रियदर्शनी कॉलनी, जाधववाडी, इत्यादी परिसरांत आरोग्य विभाग, नागरी कुटुंब कल्याण केंद्र या विभागांनी संयुक्तपणे डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबविली.
सदरच्या मोहिमेअंतर्गत ५४५ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी २६ कुटुंबांकडील साचलेल्या पाण्यामध्ये डासअळ्या आढळून आल्या.आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे २५ कर्मचारी, सर्व विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षकांनी या मोहिमेत भाग घेतला.