ठळक मुद्देसीपीआरमध्ये २ डी इको व हृदय रोग तपासणी शिबीरराष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत शिबीर, २८८ जणांची नोंदणी
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) मध्ये होत असलेल्या या शिबीरामधून २ डी इको व हृदय रोग तपासणी शिबीरामधून ज्या रुग्णांना मुंबई, पुणे येथे उपचार होणे आवश्यक आहे त्यांना रुग्णांसोबत राहणाऱ्या नातेवाईकांच्या राहण्याच्या खर्चासह सर्व मदत उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.
सीपीआरमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक, कोल्हापूर व धमार्दाय आयुक्त कार्यालय यांच्यातर्फे सीपीआरच्या आॅडीटोरियम हॉल येथे २ डी इको शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते.
कोल्हापूरसह शेजारच्या जिल्हयातून अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन याठिकाणी आले होते.दिवसभरात २८८ जणांनी याची नोंदणी केली होती. त्यामुळे सायंकाळपर्यंत या बालकांची तपासणी सुरु होती.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, मुख्यमंत्री, वैद्यकिय सहाय्यता कक्ष तथा विशेष कार्य अधिकारी कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे, धमार्दाय सहआयुक्त निवेदिता पवार, राजर्षि छत्रपती शाहू महाराज यवैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ओमप्रकाश रामानंद, सहाय्यक धमार्दाय आयुक्त आर.जी.चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस.पाटील , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.चंद्रकांत पाटील म्हणाले, हदयरोगाशी संबंधित ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची २ डी ईको व हदय रोग तपासणीचे मोफत आरोग्य शिबीर होत असून यामधील सदोष रुग्णांवर (बालकांवर) गरजेनुसार मुंबईतील नामवंत रुग्णालय,कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून पुर्णपणे मोफत पुढील उपचार करण्यात येणार आहेत.
आर्थिक परिस्थितीमुळे कोणीही गरजवंत उपचारापासून वंचित राहणार नाही. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. प्रत्येक गरजवंताला वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी यासाठी कावळानाकाजवळील शासकीय विश्रामगृह येथे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.ओमप्रकाश शेटे म्हणाले, पैशाअभावी उपचार न मिळणे हे अत्यंत दुखदायक असून असे होऊ नये यासाठी मुख्यमंत्री, वैद्यकिय सहाय्यता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. यामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. पूर्वी 25 हजार रुपये असणाऱ्या वैद्यकीय मदतीच्या रकमेत वाढ करुन दीड लाखापर्यंत करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.या कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे साडे सहाशे कोटी रुपयांचे काम गेल्या तीन वर्षात झाले आहे.
डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची कामगिरी राज्यात पहिल्या क्रमांकाची आहे. गतवर्षी १०७० पैकी १०५७ मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये 197 पैकी 97 मुलांवर हृदयरोगाच्या शस्त्रक्रिया झाल्या. अशा प्रकारच्या शिबीरांमधून दुर्धर आजार असणा?्या मुलांना उपचार उपलब्ध होऊन ते बरे होतात.डॉ. रामानंद यांनी स्वागत तर डॉ. एल.एस.पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुंबई एस आर सी सी चिल्ड्रन हॉस्पीटल विशेष तज्ञ डॉ. दिपक चंगलाणी,त्यांचे पथक,डॉ. शिशिर मिरगुंडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, यांच्यासह शिबीरार्थी उपस्थित होते. आर. जी. चव्हाण यांनी आभार मानले.