कोल्हापूर : ज्याच्या आगमनाने घराघरांत सुखसमृद्धी मांगल्य आणि आनंदाची बरसात झाली, त्या लाडक्या गणपती बाप्पांना ‘पुढच्या वर्षी लवकर या..’ अशी आळवणी, चिरमुऱ्यांची उधळण करत भक्तांनी सोमवारी जड अंत:करणाने निरोप दिला. पुरोगामी आणि जागरूक कोल्हापूरकर असल्याची प्रचिती देत शहर व जिल्ह्यातून अंदाजे तीन लाख घरगुती गणेशमूर्तींचे कुंडात पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. सुमारे शंभर टन निर्माल्य जमा झाले. पुरोगामी व विज्ञानप्रेमी करवीरकरांनी यंदा मूर्ती विसर्जनामध्ये एक पाऊल पुढे टाकले.वर्षभराची प्रतीक्षा आणि महिन्याभराच्या तयारीनंतर पाच दिवसांपूर्वी गणपती बाप्पांचे घरोघरी आगमन झाले. पाठोपाठ आलेल्या गौराई आणि शंकरोबा या परिवार देवतांसाठी सुंदर आरास, आरती, पंचपक्वानाचा नैवेद्य करताना त्याच्या भक्तीत सगळे दंग झाले. रविवारी घरोघरी गौरी पूजन झाले. रात्री गल्लोगल्ली सजून धजून आलेल्या महिलांनी झिम्मा-फुगडीचा फेर धरत रात्र जागवली.नदीकाठच्या गावांतूनशंभर टक्के प्रतिसादगणेशमूर्ती विसर्जनाची पाहणी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रशांत गायकवाड, कडले, सुजय मोरे यांच्यासह पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड, दिलीप देसाई, अनिल चौगुले यांच्या टीमने राधानगरीतील परळी गावापासून ते नृसिंहवाडीपर्यंतच्या नदीकाठच्या गावांची पाहणी केली. यात नदीकाठच्या गावांनी शंभर टक्के निर्माल्य दान केल्याचे दिसून आले, तर गणेशमूर्तींचेही काहिली, विसर्जन कुंडात पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले.प्लास्टिक बंदीमुळे निर्माल्यात घटगतवर्षी कोल्हापूर शहरातून १२० टन निर्माल्य जमा झाले होते. गतवर्षीपर्यंत निर्माल्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांसह अन्य साहित्य मोठ्या प्रमाणात टाकले जात होते. यंदा मात्र प्लास्टिक बंदीमुळे त्यात घट होऊन ती शंभर टनावर आली होती. यंदाच्या वर्षी मात्र प्लास्टिक बंदीचा सकारात्मक परिणाम दिसून आला.पर्यावरणपूरक विसर्जन मोहिमेस जिल्हा परिषदेला यशगेले तीन वर्षे कोल्हापूर जिल्हा परिषदेने राबविलेल्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जन मोहिमेला यंदाही चांगले यश मिळाले. सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत २ लाख ३९ हजार ७४८ गणेशमूर्ती दान करण्यात आल्या असून, ७०३ ट्रॉली आणि १७६ घंटागाड्यांतून निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने महसूल खात्याच्या सहकार्याने यंदाही गावागावांमध्ये मूर्तीदान आणि निर्माल्य संकलनासाठी चांगले नियोजन केले होते. गावातील ग्रामपंचायतींच्या पदाधिकाºयां-सोबतच विविध सहकारी संस्था, तरुण मंडळे यांच्या सहकार्यामुळे गतवर्षीपेक्षा जास्त मूर्ती नागरिकांनी नदी, विहिरीत, पाणीसाठ्यात न सोडता त्या दान करण्याचा निर्णय घेतला. तालुकावार मूर्ती दान खालीलप्रमाणे.पर्यावरणपूरक विसर्जित मूर्ती (रात्री आठ वाजेपर्यंत)इराणी खण : ६000गांधी मैदान विभागीयकार्यालय : ४,६३०पंचगंगा नदी घाट : ३000रंकाळा तलाव : ३ हजारराजाराम तलाव : १६५५कोटितीर्थ : ८५७लक्षतीर्थ : ७४०करवीर ५८,३६५ कागल १५,७९७भुदरगड २१,0९0 गगनबावडा ३,२00गडहिंग्लज १९,७१२ हातकणंगले २४,८९५पन्हाळा २५,६३0 शाहूवाडी १६,0४३शिरोळ २१,७२२ राधानगरी १0,६00आजरा १५९७५ चंदगड ६७१९
कोल्हापूर जिल्ह्यात ३ लाख गणेशमूर्ती दान, १०० टन निर्माल्य जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:42 AM