कोल्हापूर : ३१ डिसेंबरच्या निमित्ताने पाश्चात्त्य विकृतीचे अंधानुकरण केल्याने होणारे भारतीय संस्कृतीचे अध:पतन रोखणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. हाच धागा पकडून कोल्हापूर शहर युवा सेनेच्यावतीने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली नागरी सुरक्षा व जनजागृती अभियान महानगरपालिका चौक (माळकर तिकटी) येथे राबविण्यात आले.सुरक्षा जीवनाचा अर्थ आहे, सुरक्षेविना सर्वच व्यर्थ आहे’ ‘गडकोट किल्ल्यांचे रक्षण हीच शिवरायांची शिकवण’ मद्यपान टाळा, अपघात टाळा अशा आशयाचे फलक हातात घेऊन हे अभियान राबविण्यात आले.
यावेळी प्रबोधनात्मक पत्रके वाटप करण्यात आली. तसेच यातून ३१ डिसेंबर रोजी ऐतिहासिक किल्ल्यांचे पावित्र्य सर्वांनी जपावे, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास होईल असे वर्तन करू नये, मद्यपान टाळावे, असे आवाहन युवा सैनिकांनी नागरिकांना केले.या उपक्रमात ऋतुराज क्षीरसागर, युवासेना जिल्हा समन्वयक योगेश चौगुले, शहर युवा अधिकारी चेतन शिंदे, पीयूष चव्हाण, विश्वदीप साळोखे, जिल्हा सरचिटणीस अविनाश कामते, प्रशांत जगदाळे, शैलेश साळोखे, सौरभ कुलकर्णी, अभिजित गोयानी, अभिषेक जाधव, कपिल पोवार, अवधूत घाटगे, अक्षय बोडके, अक्षय पाटील, शरद चौगुले, प्रज्वल निकम, के. पी. राजपुरोहित, प्रज्वल पतंगराव, ऋतुराज डफळे, सुनील शिंदे, अमोल कांबळे, जितू शिंदे, आदित्य टिटवेकर, राजवर्धन साळोखे, शिवराज झेंडे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.