शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
2
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
3
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
4
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
5
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
6
विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २९वर; बिहारमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर, काहींची दृष्टी गेली  
7
खासदारकी तर गेली, आता निदान आमदारकीची इच्छा तरी पूर्ण करा; विधानसभेसाठी पराभूत खासदारांची भाऊगर्दी 
8
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
9
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
10
१३ काेटी लाेक अत्यंत गरीब; १८१ रुपयांपेक्षाही कमी रोजची कमाई, दाेन वर्षांत गरिबीत घट
11
रेल्वे प्रवासाचे आरक्षण आता १२० नव्हे, ६० दिवस आधी करा 
12
कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो तोंडघशी; ठोस पुरावे नव्हते
13
देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते - हॅरिस 
14
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
15
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
16
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
17
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
18
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
19
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल

LokSabha2024: ‘कोल्हापुरा’त ४८, तर ‘हातकणंगलेत’ ३६ टक्क्यालाच गुलाल

By राजाराम लोंढे | Published: May 06, 2024 2:12 PM

मागील पाच निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी..जाणून घ्या

राजाराम लोंढेकोल्हापूर : लोकसभेच्या मागील पाच निवडणुकींतील लढती, झालेले मतदान आणि विजयी उमेदवाराच्या मताची टक्केवारी पाहिली तर सरळ लढतीत किमान ४८ टक्के, तर बहुरंगी लढतीत किमान ४३ टक्के मते घेतली तरच गुलाल लागला आहे. त्यामुळे या निवडणुकीत ‘कोल्हापूर’ मतदारसंघातील विजयी उमेदवाराला ४८ टक्के मात्र हातकणंगलेत धैर्यशील माने, सत्यजित पाटील व राजू शेट्टी यांच्यात अटीतटीची लढत असल्याने येथे ३६ टक्के मते घेणाऱ्याला गुलाल लागणार हे निश्चित आहे. त्यादृष्टीने उमेदवारांच्या ‘थिंक टँक’ने जोडण्या लावल्या आहेत.‘कोल्हापूर’ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून संजय मंडलिक, तर आघाडीकडून शाहू छत्रपती यांच्यासह विविध पक्ष व अपक्ष असे २३ उमेदवार रिंगणात आहेत. हे जरी खरे असले तरी खरी लढत मंडलिक व शाहू छत्रपती यांच्यातच होत आहे. इतर उमेदवार किती मते घेतात यावर विजयाचा लंबक अवलंबून असला तरी अपक्षांचा फटका बसू नये, यासाठी दोन्ही उमेदवारांनी जोडण्या लावल्या आहेत.मागील पाच निवडणुकीत या मतदारसंघात सरासरी ६९.९० टक्के मतदान झाले आहे. मताची आकडेवारी आणि लढत पाहिली तर येथे विजयी होण्यासाठी किमान ४८ टक्के मते घेणे गरजेचे आहे. या मतदारसंघात १९ लाख २१ हजार ९३१ मतदान आहे, सरासरी ७० टक्के मतदान झाले तर विजयी उमेदवाराला किमान ६ लाख ४५ हजार ७६८ मतांची गरज भासणार आहे.

हातकणंगले मतदारसंघात महायुतीकडून धैर्यशील माने, आघाडीकडून सत्यजित पाटील-सरूडकर, स्वाभिमानीकडून राजू शेट्टी, वंचित आघाडीकडून डी. सी. पाटील यांच्यासह तब्बल २७ उमेदवार रिंगणात आहेत. येथे बहुरंगी लढत असल्याने छोट्या राजकीय पक्षांसह अपक्षांनी घेतलेले मतदान दिग्गजांची अडचण करू शकतात. या मतदारसंघात १८ लाख ०१ हजार २०३ मतदान आहे.मतदानाचा टक्का वाढवण्याचे आव्हान

लोकसभेच्या मागील पाच निवडणुकींत सरासरी ६९ टक्केच मतदान झाले आहे. यावेळी निवडणुकीत चुरस असली तरी वाढलेले तापमान व फोडाफाेडीच्या राजकारणामुळे मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह दिसतो. त्यामुळे उमेदवारांना मतदानाचा टक्का वाढवण्याचे आव्हान आहे.असे झाले तर मागील पाच निवडणुकींत मतदाननिवडणूक - कोल्हापूर मतदारसंघ - इचलकरंजी/ हातकणंगले मतदारसंघ१९९९             ७२ टक्के                      ७२ टक्के२००४             ६९.९२ टक्के                ६५.१० टक्के२००९             ६४.९२ टक्के                ६७ टक्के२०१४             ७१.७१ टक्के                ७२.९९ टक्के२०१९             ७०.९७ टक्के                ७० टक्के

मागील पाच निवडणुकींत विजयी उमेदवारांची टक्केवारीनिवडणूक - मतदारसंघ - विजयी उमेदवार - कंसात टक्केवारी१९९९ - कोल्हापूर  - सदाशिवराव मंडलिक - (४६ टक्केे)१९९९ - इचलकरंजी - निवेदिता माने - (४१ टक्के)२००४ - कोल्हापूर  - सदाशिवराव मंडलिक - (४९ टक्के)२००४ - इचलकरंजी -  निवेदिता माने - (५३ टक्के)२००९ - कोल्हापूर  - सदाशिवराव मंडलिक - (४१ टक्के)२००९ - हातकणंगले - राजू शेट्टी - (४९ टक्के)२०१४ - कोल्हापूर - धनंजय महाडिक - (४८ टक्के)२०१४ - हातकणंगले - राजू शेट्टी - (५३ टक्के)२०१९ - कोल्हापूर - संजय मंडलिक - (५६ टक्के)२०१९ - हातकणंगले - धैर्यशील माने - (४६ टक्के)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४hatkanangle-pcहातकणंगले