कोल्हापूर : केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरुन ६० करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेऊन पाच महिने उलटले तरी तो अद्याप कागदावरच आहे. यासह अनेक विविध मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. यासाठी प्रसंगी लोकसभा,विधानसभा निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्याच्या तीव्र भावना महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)च्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. त्याचबरोबर उंबरठा तेथे ज्येष्ठ नागरिक सभासद व गाव तेथे महासंघाची शाखा असा अजेंडा राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.‘फेस्कॉम’ कोल्हापूर विभागाच्या नवनिर्वाचित कार्यकारीणीने ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदीच्छा भेट देऊन प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी विभागीय अध्यक्ष पी. के. माने (सांगली), उपाध्यक्ष यशवंतराव चव्हाण (जत), सचिव अंजुमन खान (मिरज), सहसचिव सोमनाथ गवस, कोषाध्यक्ष शरद फडके,(कोल्हापूर), कार्यकारीणी सदस्य विजय चव्हाण (कोल्हापूर), आनंदराव पाटील (साखराळे, ता. वाळवा), महिला सदस्य डॉ. विभा शहा (कोल्हापूर) या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.सर्व कार्यकारीणीचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी उपवृत्त संपादक चंद्रकात कित्तुरे उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरुन ६० करण्याचा शासन निर्णय करुन त्याच्या अंमलबजावणीसाठी महसूल, महापालिका, समाज कल्याणसह २१ विभागांना कळविले आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे अंजुम खान यांनी सांगितले. यासह विविध मागण्यांसाठी लवकरच सर्व खासदार व आमदारांची भेट घेऊन निवेदन देऊन अधिवेशनामध्ये प्रश्न मांडण्याची विनंती केली जाईल, असे सांगितले.पी.के.माने यांनी नवीन कार्यकारीणीचा अजेंडा जाहीर केला. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे, गाव तिथे महासंघाची शाखा, उंबरा तेथे ज्येष्ठ नागरिकांचे सदस्यत्व, ज्येष्ठ नागरिकांनी नेत्रदान, अवयवदान, त्वचादान करावे यासाठी प्रबोधन, एकाकी ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस भेट हा उपक्रम, यासाठी महिन्यातून एकदा पोलिस व महासंघाची बैठक, हेल्पलाईन सुरु करणे, विविध योजनांमधून पेन्शनचा लाभ मिळवून देणे, शासन पातळीवरील प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा केला जाईल असे सांगितले. विजय चव्हाण यांनी महासंघ फक्त मागण्यांसाठी लढत नाही तर सामाजिक कार्यातून ज्येष्ठांसह समाजाचे प्रबोधन करत असल्याचे सांगितले.
कोल्हापूर : ज्येष्ठ नागरिकांसाठी ६०वर्षाची वयोमर्यादा कागदावरच, ‘लोकमत’ला सदीच्छा भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 3:47 PM
लोकसभा,विधानसभा निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्याच्या तीव्र भावना महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)च्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. त्याचबरोबर उंबरठा तेथे ज्येष्ठ नागरिक सभासद व गाव तेथे महासंघाची शाखा असा अजेंडा राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकांसाठी ६०वर्षाची वयोमर्यादा कागदावरच, ‘लोकमत’ला सदीच्छा भेट ‘फेस्कॉम’च्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या व्यथा, उंबरठा तेथे ज्येष्ठ नागरिक सभासद