कोल्हापूर : कुणी लादून नव्हे, तर वस्तुस्थिती जाणून घेऊन आणि स्वखुशीने कोल्हापुरातील शिक्षण वाचवा चळवळीचे नेतृत्व स्वीकारले आहे. चर्चेसाठी कधीही आणि कुठेही येण्याची माझी तयारी असल्याचे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले.शिक्षण वाचवा कृती समितीने भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतरच कोल्हापुरात सुरू झालेल्या शिक्षण वाचवा चळवळीचे नेतृत्व स्वीकारले आहे.प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी दहा पटसंख्येखालील शाळा बंद करणे हा उपाय नाही. शिक्षकांचे प्रलंबित वेतन, शाळांच्या इमारतीची दुरवस्था, आदी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याबाबत कोणत्याच सरकारने ठोस कार्यवाही केलेली नाही. शिक्षणाचा दर्जा आणि स्थिती सुधारण्यासाठी शिक्षणमंत्र्यांसह सर्वच घटकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
पाकिस्तानला जगवायचे आहे का?केंद्र सरकारने पाकिस्तानमधून साखर आयात केली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, आपल्या देशातील शेतकऱ्याला मारून सरकारला पाकिस्तानला जगवायचे आहे का?