कोल्हापूर : राज्य सरकारच्या नियमांच्या अधीन राहून रक्तदान शिबिरांचे आयोजन करा, रक्तदात्यांना प्रलोभने दाखवून रक्तदान शिबिरे घेणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची तयारी अन्न व औषध प्रशासनानी केली आहे. याबाबत रक्तपेढ्यांची असोसिएशन तयार करण्यात आली असून, चुकीचे काम करणाऱ्यां बॅँकांची थेट तक्रार अन्न-औषध प्रशासन विभागाकडे केली जाणार आहे.रक्तसंकलन करण्याच्या स्पर्धेमुळे त्यात व्यावसायिकपणा आला असून, रक्तदात्यांना मोठमोठी प्रलोभने दाखवून सर्रास कॅम्पचे आयोजन केले जात आहे. या प्रकारामुळे रक्ताची गुणवत्ता ढासळत चालली आहे. रुग्णांच्या जिवाशी राजरोसपणे खेळले जाते.
याबाबत ‘लोकमत’च्या गुरुवार (दि. २१)च्या अंकात ‘रक्तदात्यांना प्रलोभने’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. त्याची दखल अन्न व औषध प्रशासनाने घेतली. रक्तदात्यांना प्रलोभने दाखविणाºया रक्तपेढ्यांवर थेट कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, तशा सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून दिल्या गेल्या आहेत.
जिल्ह्यातील रक्तपेढीचालकांची गुरुवारी कोल्हापुरात तातडीची बैठक झाली. यामध्ये रक्तपेढीच्या व्यावसायिकपणाची जोरदार चर्चा झाली. एक-दोन रक्तपेढ्यांमुळे सर्वच रक्तपेढ्या बदनाम होत आहेत. यासाठी ‘कोल्हापूर जिल्हा ब्लड बॅँक असोसिएशन’ची स्थापना करण्यात आली. असोसिएशनच्या माध्यमातून बॅँकांच्या कामकाजावर अंकुश ठेवला जाणार आहे.
रक्तदानाच्या घोषणा असणारे व सरकारच्या नियमांच्या अधीन राहून पेन, किचेन, टोप्या शिवाय भेटवस्तू वाटप करता येणार नाही. त्याचबरोबर मोठ्या भेटवस्तू देऊन रक्तदान कॅम्प घेणाऱ्यांची थेट तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केली जाणार आहे.
ऐच्छिक रक्तदानासाठी पुढाकाररक्तदान हे ऐच्छिक आहे. त्यासाठी आमिषे दाखवणे चुकीचे आहे. रक्तदात्यांबरोबरच ब्लड बॅँकांनी राष्ट्रीय काम म्हणून रक्तदान व रक्त संकलन करणे गरजेचे आहे.
काही ब्लड बॅँकांमुळे इतरांना त्रास होत आहे. यासाठी असोसिएशची स्थापना केली असून त्याच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाणार आहे.- डॉ. राजेंद्र चिंचणीकर,सदस्य, ब्लड बॅँक असोसिएशन)