कोल्हापूर : रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर व भास्कराचार्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या कै. मंगेशराव कुलकर्णी स्मृती पायोनियर चषक पंधरा वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत आदित्य सावळकरने विजेतेपद पटकाविले, तर सारंग पाटील यास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
जयलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या स्पर्धेत प्रारंभापासून आदित्यने आठ पैकी साडेसात गुण मिळविले त्याला विजेतेपदाचे रोख दोन हजार रुपये व पायोनिअर चषक देऊन गौरविण्यात आले.आठवा मानांकित वसंतराव देशमुख हायस्कूलचा सारंग पाटीलने सात गुण मिळवून उपविजेतेपद मिळविले .त्याला रोख पंधराशे रुपये व चषक देऊन गौरविले. या स्पधेर्चा चार वेळचा गतविजेता व आग्रमानांकित रेंदाळचा श्रीराज भोसलेस साडेसहा गुणासह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेचा निकाल असा , सोहम चाळके ( पाचवा), शर्विल पाटील(सहावा), वरद आठल्ये (सातवा), कौस्तुभ गोटे कबनूर (आठवा), समृद्धी कुलकर्णी (नववी), वैष्णवी पाटील,(दहावा) , हर्षिता काटे (अकरावा) यांचा समावेश आहे.
विजेत्यांना उद्योजक नितीन वाडीकर यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी महेश कुलकर्णी, चाटे शिक्षण समुहाचे विभागीय संचालक डॉ. भारत खराटे, रोटरी क्लबचे मेघराज चुघ, े, सुभाष मालु, गिरीश जोशी, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव भरत चौगुले, मनिष मारुलकर, उत्कर्ष लोमटे, पुष्कर जाधव, प्रितम घोडके, तुषार शर्मा आदी उपस्थित होते.जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर व भास्कराचार्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या कै. मंगेशराव कुलकर्णी स्मृती पायोनियर चषक पंधरा वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यासोबत मान्यवर उपस्थित होते.