आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : बीएस-३ इंजिन असलेल्या वाहन विक्रीवर शनिवारपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बंदी घातली. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत सवलतीच्या दरात सुमारे चार हजार वाहनांची नव्याने भर पडली.सर्वोच्च न्यायालयाने भारत स्टेज-३ (बीएस ३) वाहनांच्या विक्री व नोंदणीवर कार्बन उत्सर्जनामुळे नागरिकांवर होणाऱ्या परिणामांचा विचार करून बंदी घातली आहे. त्यामुळे शनिवारपासून देशभरात ‘बीएस-४ मानके’ असलेलीच वाहने कंपन्यांना विक्री करता येणार आहेत. आतापर्यंत उत्पादित केलेल्या दुचाकीसह चारचाकी वाहने ही ‘बीएस-३’ मानके इंजिन असलेली होती. त्यांचा स्टॉक तसाच राहणार म्हणून कंपन्यांनी नामी शक्कल लढवत किमतीत मोठी सूट देऊन ही वाहने खपवली. एकट्या कोल्हापुरात गेल्या दोन दिवसांत चार हजार नवीन वाहनांची भर पडली आहे. या नवीन वाहनांची नोंदणी चेसीस क्रमांक, मालकाचे नाव, विमा पॉलिसी क्रमांक, मॉडेल क्रमांक प्रत्येक वाहन विक्रेत्यांकडून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने यादी मागविण्यात आली आहे. त्यानुसार निकषात बसतील अशाच वाहनांची नोंदणी कार्यालयाकडे केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून व परिवहन आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार अशा वाहनांची नोंदणी केली जाणार आहे. चेसीस क्रमांक, मालकाचे नाव, विमा पॉलिसी क्रमांक व नाव, मॉडेल क्रमांक यांची पडताळणी केली जाईल. जे वाहन निकषात बसेल अशाच वाहनांची नोंदणी केली जाणार आहे. याशिवाय वाहन विक्रेत्यांनी चुकीची माहिती दिल्यास कडक कारवाई केली जाईल.- डॉ. डी. टी. पवार,
प्रादेशिक परिवहन अधिकारी,