शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

कोल्हापूर : आयुक्तांच्या ठोस भूमिकेमुळे ‘अमृत’ला बळ, कोट्यवधीचा निधी सत्कारणी लागण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 11:16 AM

कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ‘अमृत’ योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरात झालेल्या अशास्त्रीय वृक्षारोपणाची दखल घेऊन याबाबत नेमकी कामाची दिशा ठरवून संवेदनशीलता दाखवून दिली आहे.

ठळक मुद्दे आयुक्तांच्या ठोस भूमिकेमुळे ‘अमृत’ला बळकोट्यवधीचा निधी सत्कारणी लागण्याची गरज

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ‘अमृत’ योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरात झालेल्या अशास्त्रीय वृक्षारोपणाची दखल घेऊन याबाबत नेमकी कामाची दिशा ठरवून संवेदनशीलता दाखवून दिली आहे.गेली अनेक वर्षे सर्वत्रच केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून वृक्षारोपणाची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतल्या जातात. मात्र, झाडे लावल्यानंतर ती जगली की नाही याची अनेकदा खात्री केली जात नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यांत शहरातील बेलबागेतील खणीशेजारी सहा, सात फूट उंचीची झाडे आणून ठेवली गेली. चारच दिवसांत पावला-पावलाला झाडे लावण्यात आली आणि भरउन्हाळ्यात वृक्षारोपण कसे सुरू आहे याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली.जागरूक नागरिकांनी हा प्रकार समोर आणल्यानंतर ‘लोकमत’ने मालिकेच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात वृक्षारोपण व अनुषंगिक कामांवर खर्च झालेले १ कोटी रुपये, आता खर्च होऊ घातलेले १ कोटी ६२ लाख रुपये आणि २ कोटी रुपयांचे संभाव्य नियोजन याची मांडणी करून हा निधी सत्कारणी लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली.खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या संपूर्ण प्रकाराची दखल घेऊन आयुक्तांना पत्र दिले. महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेचे ‘सदिच्छा दूत’ डॉ. मधुकर बाचूळकर, जैवविविधता समिती आणि वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य उदय गायकवाड, अनिल चौगुले यांनी याबाबतची मते मांडली. परिणामी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या सर्व ठिकाणांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला.केवळ एकटेच जाऊन पाहणी करण्यापेक्षा महापालिकेचे अधिकारी, कंत्राटदार, सल्लागार, पर्यावरण अभ्यासक अशा सर्वांना घेऊन अडीच तास ही पाहणी केल्यानंतर ‘लोकमत’ने मांडलेल्या मुद्द्यांवर शिक्कामोर्तब झाले आणि म्हणूनच चुकीच्या ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या दुरूस्त करण्याचाही निर्णय झाला.

अरे, नर्सरी केलीय कायमंगळवार पेठेतील बेलबागेत खणीजवळ पावला-पावलावर झाडे लावल्याचे ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. मात्र महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने ‘आम्ही चार ते पाच फुटांवर झाडे लावली आहेत,’ असे ठामपणे सांगितले होते. मात्र, हेच अधिकारी बेलबागेत गाडीतून उतरल्यानंतर त्यांनी ‘अरे, झाडं लावलाय का नर्सरी केलायं’ असे उद्गार काढले आणि अखेर येथील काही झाडे काढून दुसरीकडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

ह्याचे लॉजिक काय?आयुक्त डॉ. चौधरी यांनी एकेठिकाणी कंत्राटदारांना बोलावून ‘एवढ्या मोठ्या झाडाखाली ही झाडे लावण्यापाठीमागचे तुमचे लॉजिक काय,’ अशी स्पष्ट विचारणा केली. तुम्ही किती झाडे लावली या आकड्यांची काळजी करू नका. योग्य अंतरावर झाडे लावा, जगवा. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आज जी चर्चा झाली त्यात ज्या सूचना केल्या आहेत त्याचे प्रोसिडिंग करा, अशा सूचनाही डॉ. चौधरी यांनी सल्लागारांना केल्या. मी स्वत: पुन्हा या सर्व ठिकाणांची पाहणी करणार आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका