कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील एकूण ३५० केंद्रांतून मतदान प्रक्रियेचे लाईव्ह वेब कास्ट करण्यात आले. या दोन्ही मतदार संघातील ७१ क्रिटिकल मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून निवडणूक विभागाचा वॉच राहिला.कोल्हापूर मतदार संघातील २१७ आणि हातकणंगले मतदार संघामधील १३३ केंद्रातील मतदान प्रक्रिया थेट लाईव्ह वेब कास्ट करण्यात आले. त्या केंद्रांतील हालचालींवर निवडणूक आयोगाचे थेट लक्ष राहिले. हे थेट प्रेक्षपण केवळ निवडणूक विभागालाच पाहता येत होते. त्यासह या दोन्ही मतदारसंघांमधील एकूण ७१ क्रिटिकल मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून निवडणूक विभागाची नजर राहिली. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागामध्ये स्वतंत्र कक्ष कार्यन्वित करण्यात आला होता.
‘पीडीएमएस’ अॅपवर आकडेवारीमतदानाची दर दोन तासांनी आकडेवारी समजण्यासाठी निवडणूक विभागाने पोल डे मॉनिटरिंग सिस्टीम (पीडीएमएस) हे अॅप तयार केले आहे. त्यावर मंगळवारी दर दोन तासांची मतदानाची आकडेवारी समजत होती.