शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

कोल्हापूर : क्रिकेटविश्वाचे अनोखे प्रदर्शन ‘ ब्लेड्स आॅफ ग्लोरी’ ४ पासून बाळ पाटणकर; रोहन पाटे- कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 6:54 PM

सचिन तेंडुलकरच्या बॅटपासून टी-शर्ट, सर डोनाल्ड ब्रॅडमन, विराट कोहली, सनथ जयसूर्या, ब्रायन लारा, रिचर्ड असा क्रिकेटमधील दिग्गजांनी वापरलेल्या क्रिकेट साहित्याचे संग्राहक रोहन पाटे यांचे ‘ब्लेड्स आॅफ ग्लोरी’ हे अनोखे प्रदर्शन ४ ते १० फेबु्रवारीदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत शाहू स्मारक भवनात आयोजित केले आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देक्रिकेटविश्वाचे अनोखे प्रदर्शन ‘ ब्लेड्स आॅफ ग्लोरी’ ४ पासून बाळ पाटणकररोहन पाटे- कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे आयोजन

कोल्हापूर : सचिन तेंडुलकरच्या बॅटपासून टी-शर्ट, सर डोनाल्ड ब्रॅडमन, विराट कोहली, सनथ जयसूर्या, ब्रायन लारा, रिचर्ड असा क्रिकेटमधील दिग्गजांनी वापरलेल्या क्रिकेट साहित्याचे संग्राहक रोहन पाटे यांचे ‘ब्लेड्स आॅफ ग्लोरी’ हे अनोखे प्रदर्शन ४ ते १० फेबु्रवारीदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत शाहू स्मारक भवनात आयोजित केले आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी बुधवारी दिली.सचिन तेंडुलकरच्या बॅटपासून त्याने विश्वचषकामध्ये वापरलेल्या टी-शर्टपर्यंत, सर डोनाल्ड ब्रॅडमन यांची खेळलेली बॅट, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीपासून सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरनने विक्रम रचलेला चेंडू, पॅड, ब्रायन लारा, वीरेंद्र सेहवाग, मायकेल क्लार्क, माहेला जयवर्धने, ख्रिस गेल यांच्या बॅट्स, सौरभ गांगुली, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग, पीटरसन, मार्क वॉ, अ‍ॅलन बोर्डर, डेसमंड हेन्स, गार्डन ग्रिनीज यांनी स्वाक्षरी केलेल्या क्रिकेटविषयक वस्तू, माल्कम मार्शलची टोपी, रिचर्डची जर्सी, डेव्हिड बूनचा टी-शर्ट, जावेद मियॉँदादची स्वाक्षरी असलेली बॅट, राहुल द्रविड , कॅलिस, पाँटिंग यांच्या क्रिकेट वापरातील वस्तू, पाकिस्तानचा सईद अन्वरने भारताविरु द्ध चेन्नई येथे केलेल्या १९४ धावांची बॅट, विश्वचषक २०१५ मध्ये वापरलेले बॉल, बॅट, स्मृतिचिन्हे अशा ५०० हून अधिक वस्तूंचा या प्रदर्शनात समावेश आहे. यासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व तडाखेबाज क्रिकेटपटू विराट कोहली यांनी ज्या बॅटच्या मदतीने धावांचा पाऊस पाडला, त्या बॅटसमवेत छायाचित्र काढण्यासाठी सेल्फी पॉइंटही या प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे.या प्रदर्शनात कोल्हापूरकर ज्येष्ठ खेळाडूंच्या संग्रहातील क्रिकेट बॅट, दुर्मिळ छायाचित्रे, वृत्तपत्र कात्रणे, वस्तू यांचाही समावेश केला जाणार आहे. तरी या वस्तू क्रिकेटप्रेमींनी असोसिएशनकडे आणून देऊन त्याही प्रदर्शित करण्याची संधी असोसिएशनला द्यावी, असे आवाहनही पाटणकर यांनी केले आहे. यावेळी उपाध्यक्ष चेतन चौगुले, सचिव रमेश कदम, सहसचिव अभिजित भोसले, बापूसाहेब मिठारी, नितीन पाटील, माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Cricketक्रिकेटkolhapurकोल्हापूर