शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

कोल्हापूर : बापट कॅम्प, लाईन बझार पंपिंग स्टेशन डिसेंबरअखेर पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 12:06 PM

पंचगंगा प्रदूषण रोखण्याबाबत बापट कॅम्प आणि लाईन बझार नाल्यावरील पंपिंग स्टेशन डिसेंबरअखेर पूर्ण करणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्देबापट कॅम्प, लाईन बझार पंपिंग स्टेशन डिसेंबरअखेर पूर्णआयुक्तांची माहिती : पुणे येथे प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घेतली आढावा बैठक

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषण रोखण्याबाबत बापट कॅम्प आणि लाईन बझार नाल्यावरील पंपिंग स्टेशन डिसेंबरअखेर पूर्ण करणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आढावा बैठक पुण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत आयुक्त डॉ. चौधरी यांनी ही माहिती दिली.या बैठकीस कोल्हापूर, सोलापूर, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि सातारा नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नदीचे प्रदूषण रोखण्याबाबतच्या केलेल्या उपाययोजना, घनकचरा व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या आढावा बैठकीत कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पंचगंगा नदी प्रदूषण, सांडपाणी प्रक्रिया केंद्राबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी त्यांनी, बापट कॅम्प आणि लाईन बझार येथील सांडपाणी पंपिंग स्टेशनद्वारे उचलून कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर नेण्याबाबत माहिती दिली. तसेच लाईन बाजार आणि बापट कॅम्प येथील नाल्यावरील पंपिंग स्टेशन डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत पूर्ण करू, असे आश्वासन दिले.या बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव यांनी, पर्यावरण संवर्धनासाठी राखीव असलेला २५ टक्के निधी हा घनकचरा व्यवस्थापन, नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र, रंकाळा प्रदूषण रोखणे यावर नियमाप्रमाणे खर्च करण्याच्या सूचना दिल्या.

दुधाळी केंद्र महिन्यात पूर्ण क्षमतेने सुरूदुधाळी येथे १७ एम. एल. डी. क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. तो महिन्यात पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशीही माहिती आयुक्त डॉ. चौधरी यांनी या बैठकीत दिली. 

 

टॅग्स :environmentवातावरणkolhapurकोल्हापूर