कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते गुळाचा सौदा काढण्यात आला. यामध्ये गुळाला सर्वाधिक प्रतिक्विंटल ५१०० रुपये भाव मिळाला. किमान भाव तीन हजार रुपयांपर्यंत राहिला.बाजार समितीत महिन्याभरापासून गुळाची खरेदी-विक्री होत असली तर परंपरेनुसार दिवाळी पाडव्याला नवीन गुळाचा सौदा काढला जातो. यंदा गुरुवारी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी अमर पाटील यांच्या अडत दुकानात महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते गुळाचा सौदा काढण्यात आला.
यावेळी समितीचे सचिव मोहन सालपे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात सभापती कृष्णात पाटील म्हणाले, साखरेचा किमान दर निश्चित झाल्याने यंदा गुळाचा दर त्या पटीत कायम राहील, असा अंंदाज आहे. त्यात उसाचे उत्पादन अपेक्षित नसल्याने गुळाला चांगला भाव मिळेल. यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला सर्व गूळ बाजार समिती पाठवावा.संचालक परशराम खुडे, सर्जेराव पाटील, दशरथ माने, विलास साठे, उदयसिंह पाटील, बाबासाहेब लाड, नंदकुमार वळंजू, शेखर येडगे, नेताजी पाटील, उत्तम धुमाळ, संजय जाधव, शशिकांत आडनाईक, बाबूराव खोत, नाथाजी पाटील, सदानंद कोरगावकर, संगीता पाटील, शारदा पाटील, किरण पाटील, भगवान काटे, शिक्षक बॅँकेचे संचालक प्रसाद पाटील, नानासाहेब पाटील, उपसचिव राजेंद्र मंडलिक, रामचंद्र खाडे, आदी उपस्थित होते. उपसभापती अमित कांबळे यांनी आभार मानले.
महिला पदाधिकाऱ्याला पहिल्यांदाच संधीबाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पदाधिकाºयाच्या हस्ते मुहूर्तावर गुळाचा सौदा काढण्यात आला. महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते सौदा काढून समिती प्रशासनाने एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.