शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

कोल्हापूर : पाया न लागल्याने पर्यायी शिवाजी पुलाचे काम पुन्हा थांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 2:25 PM

पर्यायी शिवाजी पुलाच्या कॉलमच्या पायासाठी साडेचार मीटर खोल अंतरापर्यंत कठीण दगड लागण्याची शक्यता असताना सुमारे नऊ मीटर खुदाई करूनही पाया न लागल्याने हतबल झालेल्या यंत्रणेने सोमवारी दुपारनंतर खुदाईचे काम थांबविले.

ठळक मुद्देपाया न लागल्याने पर्यायी शिवाजी पुलाचे काम पुन्हा थांबवले कॉलमचे डिझाईन बदलणार; बुधवारी तज्ज्ञांकडून पाहणी

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या कॉलमच्या पायासाठी साडेचार मीटर खोल अंतरापर्यंत कठीण दगड लागण्याची शक्यता असताना सुमारे नऊ मीटर खुदाई करूनही पाया न लागल्याने हतबल झालेल्या यंत्रणेने सोमवारी दुपारनंतर खुदाईचे काम थांबविले.

पाया न लागल्याने आता कॉलमचे डिझाईन बदलावे लागणार आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार शासनाच्या मुंबईतील संकल्प चित्र मंडळाकडे आहेत. या मंडळाकडून जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत हे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे या कामासाठी आता पुन्हा पावसाळ्यानंतरच प्रतीक्षा करावी लागणार आहे.पर्यायी शिवाजी पुलाच्या कामांमध्ये वारंवार अडचणींचा डोंगर उभारत आहे. ‘पुरातत्त्व’चा परवाना मिळाल्यानंतरही या पुलामागील अडथळ्यांची मालिका अद्याप संपलेली नाही. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दि. ४ जूनला दिल्लीत राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणातील मंजुरीनंतर हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर दि. ७ जूनला हे काम प्रत्यक्षात सुरू झाले.

यावेळी कॉलमसाठी जमिनीपासून किमान साडेचार मीटर अंतरावर कठीण दगड लागण्याची अपेक्षा होती. त्यादृष्टीने निविदेत खर्चाची तरतूद केली; पण गेल्या सहा दिवसांत पोकलॅन मशीनने सुमारे नऊ मीटर खोलवर खुदाई करूनही पायासाठी अपेक्षित खडक न लागल्याने ठेकेदार नाराज झाले; पण पाया न लागल्याने सोमवारी दुपारी हे काम थांबविले.

खुदाई केलेल्या जागेचे मोजमाप करण्यात आले, यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता संपत अबदार, ठेकेदार एन. डी. लाड, आदी उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)​​​​​​​आता कॉलमचे डिझाईन बदलावे लागण्याची शक्यता आहे. त्यासाठीचे सर्व अधिकार हे अधीक्षक अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे शासनाच्या मुंबईतील संकल्प चित्र मंडळातील डिझाईन सर्कलकडून या कॉलमचे हेवी डिझायन तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मंडळाकडून मिळणाऱ्या प्रतिसादाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

खुदाईत विहीर?पुलाच्या कॉलमचा पाया निश्चित केलेल्या जागेत सुमारे नऊ मीटरपर्यंत खुदाई करताना त्या जागेत फक्त मातीच मिळाल्याने यापूर्वी जुन्या शिवाजी पुलाचे बांधकाम करतेवेळी पाण्याच्या आवश्यकतेसाठी येथे तात्पुरती विहीर निर्माण केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या गोलाकार खुदाईच्या जागेचा साडेतीन मीटरचा परिघ असून सुमारे १८ फूट खोल आहे. वरील गोलाकार बाजू रूंद तर तळाचा भाग निमुळता असल्याचे खुदाईवेळी दिसून आले.खर्चाचे बजेट वाढणारपर्यायी शिवाजी पुलाच्या खर्चाचे बजेट नेहमीच वाढत आहे. कधी ९, कधी १५ तर कधी १२ कोटींपर्यंत या खर्चाच्या निविदा निघत गेल्या. पुलाचे ८० टक्के सुमारे साडेनऊ कोटींचे काम नवी मुंबईच्या बांका कन्स्ट्रक्शनने पूर्ण केल्यानंतर उर्वरित २० टक्के काम सुमारे ३ कोटी ०५ लाख रुपये खर्चाच्या निविदेतून गोव्याच्या आसमास कन्स्ट्रक्शनने घेतले.

आता पाया न लागल्यामुळे त्याच जागेत हेवी डिझायन नव्याने बनविणे अगर थोड्या अलीकडे जागेत नव्याने कॉलमसाठी पायाखुदाई करावी लागणार आहे. डिझाईनमध्ये फरक पडल्याने आता पुलाचे खर्चाचे बजेट पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

बुधवारी पुन्हा पाहणीमुंबईतील संकल्प चित्र मंडळाचे सर्कल डिझायनर पुलाच्या पाहणीसाठी कोल्हापुरात दाखल होणार आहेत. त्यानंतर पुढील चालना मिळणार आहे. 

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणkolhapurकोल्हापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभागMuncipal Corporationनगर पालिका