शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

कोल्हापूर : माझ्या प्रयत्नामुळेच ‘आंबेओहोळ’ ९० टक्के पूर्णत्वास : हसन मुश्रीफ यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 12:22 PM

कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळातच ‘आंबेओहोळ’ प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हा प्रकल्प रखडला. आता दुसऱ्यांदा सुधारित मान्यता मिळाली आहे, पण त्याचे राजकीय श्रेय घेण्याची समरजितसिंह घाटगे यांची धडपड सुरू असल्याची टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.

ठळक मुद्देमाझ्या प्रयत्नामुळेच ‘आंबेओहोळ’ ९० टक्के पूर्णत्वास : मुश्रीफ यांचा दावासमरजित यांची श्रेयासाठी धडपड : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळातच ‘आंबेओहोळ’ प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हा प्रकल्प रखडला. आता दुसऱ्यांदा सुधारित मान्यता मिळाली आहे, पण त्याचे राजकीय श्रेय घेण्याची समरजितसिंह घाटगे यांची धडपड सुरू असल्याची टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.‘चिकोत्रा’ प्रकल्प आपल्यामुळेच पूर्ण झाला असून, ‘नागनवाडी’ प्रकल्पाचे ७० टक्के काम आपल्या कारकिर्दीतच झाले आहे. २९ कोटींच्या ‘आंबेओहोळ’ प्रकल्पाला १९९८ मध्ये मान्यता मिळाली. त्यानंतर २०१० मध्ये सुधारित ११४ कोटींच्या प्रकल्पाला मान्यता मिळवून दिली.

आता दुसऱ्यांदा २२७ कोटींची सुधारित मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाचे ९० टक्के काम आपणच पूर्ण केले. उर्वरित १० ते १५ टक्के कामासाठी शासनाने प्रचंड उदासीनता दाखविल्यामुळे हा प्रकल्प रखडला. या प्रकल्पासाठी ३५८ हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी लागत होती, त्यापैकी २४७ हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी आवश्यक असून, ८१ हेक्टर जमिनीचे वाटप केले आहे. त्याचबरोबर हेक्टरी ३६ लाख रुपये पॅकेजचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला आहे.

प्रकल्पग्रस्तांना जमीन दिल्याशिवाय ते धरणाची घळभरणी करू देत नव्हते. जमिनीऐवजी पॅकेजचा प्रस्ताव चार वर्षे शासन दरबारी धूळखात पडला आहे. त्यांना जमिनी अथवा त्याचा मोबदला दिल्याशिवाय धरणाचे काम सुरू होणे अवघड आहे. याबाबत अनेक बैठका घेतल्या, पण शासनाचे धोरण पश्चिम महाराष्ट्रात एकही थेंब पाणी न अडवण्याचे आहे. दुसऱ्या बाजूला संपूर्ण निधी विदर्भाकडे वळवला आहे.

‘आंबेओहोळ’ मुळे आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील ३९२५ हेक्टर जमिनी सिंचनाखाली येणार आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात या प्रकल्पासह ‘नागनवाडी’, ‘उचंगी’ प्रकल्पासाठी आंदोलन करणार आहे. समरजितसिंह घाटगे यांची राजकीय श्रेयासाठी धडपड सुरू असून, प्रकल्पाचे काम कोणामुळे पूर्णत्वास गेले याची जाणीव येथील जनतेला असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.भाजप सरकारकडून कोल्हापूरवर अन्याय‘कृष्णा’ लवादाप्रमाणे आघाडी सरकारच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या पाण्यापैकी केवळ १२ टीएमसी पाणी अडवण्याचे काम राहिले होते. त्यात ‘आंबेओहोळ’, ‘नागनवाडी’, ‘सर्फनाला’, ‘उचंगी’, ‘धामणी’ हे प्रकल्प त्यावेळी ज्या परिस्थितीत होते, त्याच परिस्थितीत आजही आहेत. भाजपने कोल्हापूरवर अन्याय केल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूर