प्रवीण देसाई
कोल्हापूर : आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आलेल्या बायोमेट्रिक रेशनिंगच्या ‘ई-पीडीएस’ प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये मार्च महिन्यात कोल्हापूर जिल्'ातील आजऱ्यासह कागल, भुदरगड व राधानगरी या तालुक्यांनी राज्यातील पहिल्या चार तालुक्यांमध्ये स्थान पटकाविले आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या प्रयत्नानेच बायोमेट्रिक प्रणालीमध्ये राज्यातील कोल्हापूरचे आघाडीवरील स्थान अद्याप कायम राहिले आहे.रेशनकार्डावर निव्वळ आधारपडताळणीअंती करण्यात आलेल्या धान्य वाटपाची राज्य शासनाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली मार्च महिन्याची टक्केवारी पाहता, पहिल्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूर जिल्तील आजरा तालुक्याने देखील राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्रथम स्थान पटकावत ९७.०५ टक्के इतक्या रेशनकार्डांवर धान्यवाटप केले आहे.
त्यापाठोपाठ कागल ९१.९० टक्के, भुदरगड ९१.०९ टक्के व राधानगरी ९०.०९ टक्के अशा प्रकारे जिल्'ातील एकूण ४ तालुक्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक धान्य वाटप करून राज्यात पहिल्या पाचमध्ये येण्याचा बहुमान मिळविला आहे.विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्'ातील उर्वरित सर्वच तालुक्यांनीदेखील ८० टक्क्यांहून अधिक रेशनकार्डांवर निव्वळ आधारपडताळणी अंती धान्य वाटप करून राज्यात बायोमेट्रिक रेशनिंगमध्ये मार्गदर्शक जिल्हा म्हणून आपली ओळख कायम केली आहे.
या यशापाठोपाठ, कोणीही रेशनकार्डधारक कोणत्याही रेशनदुकानांतून धान्य घेऊ शकेल अशी ‘पोर्टेबिलिटी’ची योजना, मोबाईल मेसेजद्वारे लाभार्थी रेशनकार्डधारकाला त्याने धान्य घेताच त्याच्या मोबाईलवर माहिती मिळणे, आॅनलाईन रेशनकार्ड मिळणे आदी सुविधांदेखील लवकरच कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने जोरदार तयारी केली आहे.
लवकरच तांत्रिक अडचणी दूर करण्यात येऊन जिल्'ातील अन्न सुरक्षा योजनेच्या सुमारे साडेपाच लाख इतक्या कुटुंबांतील सुमारे २५ लाख इतके लाभार्थी असलेल्या सर्वच्या सर्व शंभर टक्के रेशनकार्डावर निव्वळ आधार पडताळणीअंती धान्य वाटप करणारा जिल्हा असा लौकिक राज्यातच नव्हे तर देशातही कोल्हापूरला मिळेल. त्यादृष्टीने पुरवठा विभागाचे प्रयत्न सुरु आहेत.- विवेक आगवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी
बायोमेट्रिक रेशनिंगची टक्केवारीतालुका एकूण रेशनकार्ड ‘आधार’वर धान्यवाटप झालेली रेशनकार्ड टक्केवारीआजरा १९७९८ १९२१४ ९७.०५भुदरगड २५८३७ २३५३५ ९१.०९कागल ४१४१७ ३८०६४ ९१.९०राधानगरी ३३६४५ ३०४०७ ९०.३७