शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोल्हापूर : कॅन्सर सेंटर रुग्णालयात सव्वा कोटींचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 6:57 PM

गोकुळ शिरगाव येथील कॅन्सर सेंटर रुग्णायातील अकाऊंट व्यवस्थापकाने औषध खरेदीच्या बोगस बिलांच्या नोंदी करुन सुमारे १ कोटी ३१ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले.

ठळक मुद्दे कॅन्सर सेंटर रुग्णालयात सव्वा कोटींचा अपहाररुग्णालयाच्या अकाउंट व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील कॅन्सर सेंटर रुग्णायातील अकाऊंट व्यवस्थापकाने औषध खरेदीच्या बोगस बिलांच्या नोंदी करुन सुमारे १ कोटी ३१ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी रुग्णालयाचे अकाऊंट व्यवस्थापक अजय आनंदराव खोत (रा. लाईन बाजार, कसबा बावडा), किरण शिंदे (रा. कोडोली, ता. पन्हाळा), प्रविण दत्तात्रय आळतेकर (रा. माळवाडी, दानोळी, ता. शिरोळ) यांचे विरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २५) फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला.अधिक माहिती अशी, डॉ. सुरज भास्करराव पवार (वय ४८, रा. माळी कॉलनी, टाकाळा) यांचे गोकुळ शिरगाव येथे कॅन्सर सेंटर रुग्णालय आहे. याठिकाणी संशयित अजय खोत हा अकाऊंट व्यवस्थापक म्हणून काम करीत होता.

त्याने दि. २ जानेवारी २०१५ ते १ एप्रिल २०१६ या कालावधीत आपल्या पदाचा गैरवापर करीत औषध खरेदीच्या बोगस बिलांच्या नोंदी करुन संशयित किरण शिंदे व प्रविण आळतेकर यांचेशी संगनमत करुन औषध पुरवठ्याची खोटी बिले सादर करुन त्याप्रमाणे औषधांचा पुरवठा न करताना डॉ. पवार यांच्या रुग्णांलयात १ कोटी ३१ लाख ९० हजार रुपयांची अपहार केला.

याप्रकरणी डॉ. पवार यांनी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेवून तक्रार दिली. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेला चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार चौकशीमध्ये अपहार झालेचे स्पष्ट होताच डॉ. पवार यांच्या फिर्यादीवरुन संशयित तिघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. अपहाराची रक्कम मोठी असल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक आर. बी. शेडे करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर