कोल्हापूर : न्यू पॅलेस परिसरातील छत्रपती शाहू विद्यालयात आज, शनिवारी व रविवारी ‘कार्निव्हल २०१९’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका पद्मा मुंगरवाडी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
आज सकाळी दहा वाजता अमेरिकास्थित एल. जी. केम पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या हस्ते कार्निव्हलचे उद्घाटन होईल; तर रविवारी कार्यक्रमाच्या समारोपासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कविता घाटगे उपस्थित असतील. यावेळी शाहू छत्रपती, याज्ञसेनीराजे, राजपरिवारातील सदस्य व संचालिका राजश्री पाटील उपस्थित असतील.कार्निव्हलचे हे सलग २७ वे वर्ष आहे.
पुणे, बंगलोरसारख्या मोठ्या शहरांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत कोल्हापूर परिसरातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये या उद्देशाने १९९२ सालापासून या कार्निव्हलचे आयोजन केले जाते. यात कोल्हापूर व बाहेरगावातील असे मिळून १५ शाळा व जवळपास १५०० विद्यार्थी सहभागी होत आहे. तरी कोल्हापूरकरांनी या कार्निव्हलचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी मुख्याध्यापिका शीतल पवार, पर्यवेक्षिका शोभा वर्धमाने, पूजा चोप्रा, कुबेर शेडबाळे उपस्थित होते.आज होणाऱ्या स्पर्धाखुल्या स्पर्धा : कँडल डेकोरेशन, मास्क मेकिंग, कॅन्व्हास पेंटिंग, नृत्य, मि. मार्स आणि मिस व्हीनस (व्यक्तिमत्त्व स्पर्धा).आंतरशालेय स्पर्धा : मिले सूर मेरा तुम्हारा (समूहगीत), वादविवाद, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, कँडल डेकोरेशन, मास्क मेकिंग, कॅन्व्हास पेंटिंग, टिन टॉक (उत्स्फूर्त वक्तृत्व), दांडिया मानिया (नृत्य), बेस्ट ड्रेस.
उद्या रविवारी होणाºया स्पर्धाखुल्या स्पर्धा : सुगम संगीत, कुकिंग, पुष्परचना, पेपर बॅग मेकिंग व डेकोरेशन, रेथ मेकिंग.आंतरशालेय स्पर्धा : चक्रव्यूह (क्विझ), तराणा (गायन), मास्टर शेफ, पुष्परचना; पेपर बॅग मेकिंग, अॅड बोनान्झा, फॅन्सी ड्रेस, दि बोल्ड अॅँड दि ब्यूटीफुल (व्यक्तिमत्त्व), राज मटाज (समूहनृत्य).