कोल्हापूर : ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून परिवर्तन कला फाउंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्या ‘ऱ्हासपर्व’ या नाटकाला प्रथम, तर इचलकरंजीतील निष्पाप कलानिकेतन सेवा संस्थेने सादर केलेल्या ‘दो बजनिए’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ही माहिती शनिवारी जाहीर केली.कोल्हापूर केंद्रावर दि. १५ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत केशवराव भोसले नाट्यगृहात एकूण २४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. पुरस्कार मिळालेल्या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. आजरा येथील कृषिदूत कृषी विज्ञान संस्थेने सादर केलेल्या ‘अक्कड बक्कड’ या नाटकाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.या स्पर्धेतील अन्य निकाल पुढीलप्रमाणे
दिग्दर्शन : प्रथम क्रमांक : किरणसिंह चव्हाण (ऱ्हासपर्व), द्वितीय क्रमांक : यशोधन गडकरी (दो बजनिए), प्रकाश योजना : प्रथम क्रमांक : कपिल मुळे (कॅलिगुला), द्वितीय : अनिल सोनटक्के (दो बजनिए), नेपथ्य : प्रथम : प्रतापराव डांगरे (दो बजनिए), द्वितीय : केदार कुलकर्णी (अक्कड बक्कड), रंगभूषा : प्रथम : शंकर टोपले (महंत), द्वितीय : सदानंद सूर्यवंशी (ऱ्हासपर्व).
उत्कृष्ट अभिनय : रौप्यपदक -जितेंद्र देशपांडे (कॅलिगुला) व स्नेहल बुरसे (ऱ्हासपर्व), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र : याज्ञसेनी घोरपडे (ती फुलराणी), वृषाली केळकर (अक्कड बक्कड), कृतिका टेकाळे (अखेरचा सवाल), अंकिता कदम (नूरमहम्मद साठे), शीतल रावत (एका गर्भाशयाची गोष्ट), डॉ. श्रद्धानंद ठाकूर (अक्कड बक्कड), अनिरुद्ध भागवत (दो बजनिए), अरुण दळवी (वरचा मजला रिकामा), चंद्रशेखर फडणीस (महंत), नीलेश आवटी (अवध्य).स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मनोहर धोत्रे, शरद गायकवाड, पुरुषोत्तम देशपांडे यांनी काम पाहिले. पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले.