कोल्हापूर : भविष्यात मुले शाळेत येतील की नाही, अशी परिस्थिती तंत्रज्ञानाच्या युगामुळे निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानातील बदल्याने पालक आणि पाल्यांतील संवाद संपला आहे. संवादाचा अर्थ संपल्याने जीवनाचा अर्थ संपत चालला आहे.अशा काळात माणुसकी टिकविणे हेच आव्हान सर्वांच्या समोर उभे राहिले आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले.पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा व महिला आघाडी यांच्यावतीने सोमवारी ‘सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका’, ‘महात्मा फुले आदर्श शिक्षक’ व ‘शिक्षक समिती जीवन गौरव पुरस्कार’ वितरण समारंभात ते बोलत होते.देशमुख म्हणाले, पाल्यावर कुटूंबाचा व समाजाचा प्रभाव कमी होत चालेला आहे. जगभरातील कुंटूब व्यवस्था कोलमंडत चालली आहे. विदेशात तर रक्तांची माणसे शोधत काही जण फिरत आहेत. विश्वासाचे नाते कमी होत चाल्याने अनेक समस्या समोर येत आहे. विद्यार्थी अपयशाला खचत चालले आहेत.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आता गरजेचे बनले आहे. जो पर्यंत दुसरयांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी टाळ््या वाजविल्या जातात, तो पर्यंत समाजात माणुसकी जिंवत आहे, हे समजावे असे देशमुख यांनी सांगितले.यावेळी जेष्ठे नेते बंडोपंत किरुळकर व शिवाजीराव नांदवडेकर यांना जीवन गौरव पुरस्कराने गौरविण्यात आले. यासह विविध तालुक्यातील शिक्षकांना पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.
याप्रंसगी शिक्षम समितीचे राज्यनेते शिवाजीराव साखरे, राज्य महिला आघाडीच्या सुरेखा कदम, प्रभाकर आरडे, कृष्णात कारंडे, शंकरराव मनवाडकर, राजेंद्र पाटील, जोतीराम पाटील, राजेश सोनपराते यांच्या समितीचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष अजुर्न पाटील यांनी स्वागत केले. तर महिला जिल्हा अध्यक्ष दिपाली भोईटे यांनी प्रास्ताविक केले. स्वागत गीत वि.म. सावरवाडी यांनी गायले. सूत्रसंचालन प्रियदर्शनी पाटील, शुंभागी चपाले यांनी तर सुरेश कोळी यांनी आभार मानले.