फोटो क्रमांक - २२०७२०२१-कोल-सिटी रेन०१ आणि ०९
ओळ - कोल्हापूर शहरातील शाहुपुरी कुंभार गल्लीत असणाऱ्या अनेक घरांत गुरुवारी पहाटे पुराचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची बरीच तारांबळ उडाली. अनेक नागरिकांनी घरातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी जाणे पसंत केले.
फोटो क्रमांक - २२०७२०२१-कोल-सिटी रेन०२
ओळ - शाहुपुरी कुंभार गल्लीतील कुंभार बांधवांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती पुराच्या पाण्यातून बाहेर काढल्या आणि सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवल्या.
फोटो क्रमांक - २२०७२०२१-कोल-सिटी रेन०३
ओळ - शाहुपुरी कुंभार गल्लीत जयंती नाल्याच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी घरातील आवश्यक साहित्यासह बाहेर पडून निवारा केंद्रात आसरा घेतला.
फोटो क्रमांक - २२०७२०२१-कोल-सिटी रेन०४
ओळ - संभाजीनगर ते क्रेशर चौक दरम्यानच्या रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. सर्व सांडपाणी देवकर पाणंद चौकात येत असल्याने तेथे रस्ताही नीट दिसत नव्हता. वाहनधारकांना वाहने चालविण्याची कसरत करावी लागली.
फोटो क्रमांक - २२०७२०२१-कोल-सिटी रेन०५
ओळ - शिवाजी पेठेतील गांधी मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने मोठा जलाशय तयार झाला. पूर्वी तेथे असरणारे तळे बुजवून मैदान केले खरे, पण गुरुवारी या मैदानाला पुन्हा एकदा तळ्याचे स्वरूप आले.
फोटो क्रमांक - २२०७२०२१-कोल-सिटी रेन०६
ओळ - पूर्वीच्या काळी जयंती नदीच्या काठावर लक्ष्मीपुरीतील पुलालगत असलेले फलगुलेश्वर मंदिर जयंतीच्या जलप्रवाहात पूर्णत: बुडाले.
फोटो क्रमांक - २२०७२०२१-कोल-सिटी रेन०७
ओळ - राजारामपुरी जनता बझार चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. उद्यानाला लागून असलेल्या खाद्यपदार्थांच्या अनेक गाड्यांना पाण्याने वेढा दिला.
फोटो क्रमांक - २२०७२०२१-कोल-सिटी रेन०८
ओळ - कोल्हापूर शहराचं वैभव असलेला रंकाळा गुरुवारी सकाळी काठोकाठ भरला. आणखी सहा ते सात इंच पाणी वाढले तर टॉवर, संध्या मठ, पद्माराजे उद्यान येथून तलावातील पाणी बाहेर पडण्यास वेळ लागणार नाही.