कोल्हापूर : बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याविरोधात १० कोटी रुपयांचा अबु्रनुकसानीचा फौजदारी दावा जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे. मुश्रीफ यांनी जिल्हा बॅँकेत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याबाबत विरोध करण्याची भूमिका मुश्रीफ यांनी घेतल्यानंतर महाडिक यांनी २६ सप्टेंबर रोजी मुश्रीफ यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. दुसऱ्याच दिवशी मुश्रीफ यांनी या आरोपांचे खंडनही केले होते. तसेच अबु्रनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही दिला होता.याबाबत मुश्रीफ म्हणाले, मी महाडिक यांनी आरोप केल्यानंतर एक महिना ते खुलासा करतील म्हणून वाट पाहिली; परंतु त्यांनी तो न केल्याने मी जिल्हा न्यायालयात हा दावा दाखल केला आहे. सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये असे आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र अशा पद्धतीने महाडिक यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले.
वास्तविक त्यांच्यासारख्या इतकी वर्षे राजकारणात काम करणाऱ्या माणसाने काय बोलावे, त्याचे पुरावे काय, आपण कशा पद्धतीची टीका करतो आहोत, त्याचे परिणाम काय होणार आहेत याबाबत भान बाळगायला हवे होते.खुलासा करताना मुश्रीफ म्हणाले, यातील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा खुलासा मी केला आहे. मात्र महाडिक यांना आता न्यायालयातच याबाबतचे पुरावे सादर करावे लागतील. जिल्हा बॅँकेत आपल्याला मानणारे संचालक आहेत आणि महिला संचालकही आहेत, याचे तरी भान महाडिक यांनी ठेवायला हवे होते.
महाडिक यांनी केले होते हे आरोप१. मुश्रीफ यांनी मुलाला एजंट बनवून कमाई केली.२. इब्राहिम या व्यक्तीला एटीएमचे टेंडर दिले.३. एटीएम ठेकेदाराकडूनच दुबई, हैदराबाद दौºयाचा खर्च केला गेला.४. दोन्ही दौºयांमध्ये बारमध्ये जिल्हा बॅँकेच्या संचालकांनी धिंगाणा घातला.५. जिल्हा बॅँकेतून ११२ कोटी परत घालवून मुश्रीफांनी शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतले.
आतापर्यंत मुश्रीफांनी दाखल केले ११ दावेआतापर्यंत आपण अबु्नुकसानीचे एकूण ११ दावे दाखल केले असल्याची माहिती यावेळी मुश्रीफ यांनी दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर,आमदार साटम, आमदार सदा सरवणकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गडान्नावर, राजपत्रित अधिकारी महासंघाचे कुलथे यांच्यावर हे दावे दाखल केले होते. मंडलिक यांचे निधन झाल्यामुळे आणि क्षीरसागर यांनी गैरसमजातून आरोप केल्याचे स्पष्ट केल्यामुळे या दोघांवरील दावे मागे घेतले असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.