कोल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवसापासून थंडीची तीव्रता थोडी वाढली आहे. कमीत कमी तापमानात घट झाली असून त्याचा परिणाम दिसत आहे. पहाटे दाट धुक्यासह अंगाला झोंबणाऱ्या वाऱ्याने अंग गारठून जाते.गेले आठवड्यात जिल्हयात कडाक्याची थंडी जाणवत होती. मध्यंतरी दोन-तीन दिवस एकदमच अधून मधून ढगाळ वातावरण राहिल्याने थंडी थोडी कमी राहिली. पण आता हळूहळू थंडी वाढू लागली आहे.सोमवारी जिल्हयातील कमीत कमी तापमान १५ डिग्री पर्यंत आले होते. त्यामुळे हुडहुडी वाढत असून त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर होऊ लागला आहे. थंडी पासून बचाव करण्यासाठी कितीही उबदार कपडे घातली तरीही अंग कुडकुडतेच.
शेती कामासाठी लवकर घराबाहेर पडताना थंडीचा त्रास होत आहे. गारठलेल्या अंगाने पिकांना पाणी पाजणे, ऊस तोडणीच्या कामासाठी शेतकऱ्यांना घराबाहेर पडावे लागतेच.वाढलेल्या थंडीमुळे अंथरूण, पांघरूण लवकर बाहेर पडूच वाटत नाही. त्यामुळे शहरात सकाळी आठ वाजल्याशिवाय घरांचे दारही उघडलेले दिसत नाही. उशिरा उठल्याने दैनंदिन कामावरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे.
येत्या दोन दिवसात तापमानात थोडी वाढ होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमानात वाढ होईलच पण ढगाळ वातावरणही थोडे राहणार असल्याने थंडी कमी होण्याची शक्यता आहे.
मॉर्निंग वॉकवरही परिणामशहरात साधारणता सकाळी सहा नंतर मॉर्निंग वॉकसाठी नागरिक बाहेर पडतात. पण थंडी वाढली की वयोवृध्द नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्याचा परिणाम मॉर्निंग वॉकवर होत आहे.
जिल्ह्यातील तापमान डिग्रीमध्ये असे राहील-वार कमीत कमी जास्तीत जास्तसोमवार १५ ३०मंगळवार १७ ३१बुधवार २० ३२गुरूवार १९ ३३