शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

कोल्हापूर : कठडा दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करा, अविनाश सुभेदार यांचे आदेश, आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 7:19 PM

शिवाजी पुलाच्या तुटलेल्या संरक्षक कठड्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.

ठळक मुद्देशिवाजी पुलाच्या तुटलेल्या कठडा दुरुस्तीचे काम तातडीने सुरू कराअविनाश सुभेदार यांचे आदेशकोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक

कोल्हापूर : शिवाजी पुलाच्या तुटलेल्या संरक्षक कठड्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी दिले.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) सोमनाथ रसाळ, विभागीय वाहतूक अधिकारी सुनील शिंदे, व्हाईट आर्र्मीचे अशोक रोकडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.कोल्हापुरात २६ जानेवारी रोजी रात्री ११.५० वाजता शिवाजी पुलावरून मिनी बस वाहनचालकाचा ताबा सुटल्याने शिवाजी पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली होती. यात १३ व्यक्तींंचा मृत्यू झाला; तर तीन व्यक्ती जखमी झाल्या.

या अपघातामध्ये शिवाजी पुलाच्या झालेल्या नुकसानीमुळे लोकांच्या व वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलाच्या कठड्याची दुरुस्ती तत्काळ करणे आवश्यक आहे.त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग, कोल्हापूर यांनी या पुलाचे क्षेत्र पुरातत्त्व खात्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्याने आपत्कालीन व्यवस्थापनांतर्गत पुलाच्या संरक्षक कठड्याची तात्पुरती दुरुस्ती करण्याबाबत परवानगी देण्याची विनंती जिल्हाधिकाºयांकडे केली होती. त्यानुसार या आपत्ती व्यवस्थापन बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत कलम ३४ (ड) मध्ये असलेल्या तात्पुरत्या पूलबांधणीच्या अथवा इतर आवश्यक संरचना तयार करण्याबाबत तरतुदीनुसार शिवाजी पुलाच्या संरक्षक कठड्याच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे, असे आदेश अविनाश सुभेदार यांनी दिले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात