कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ, तसेच महागाईच्या निषेधार्थ भाजप सरकारविरोधात आज, सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’लाकोल्हापूरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या ‘बंद’ला डाव्या लोकशाही आघाडीने पाठिंबा दिला असून, त्यांनी शहरातील चौकाचौकात निदर्शने केली.पेट्रोल व डिझेलच्या किमती अनुक्रमे २११ व ४४३ टक्के वाढल्याने जीवनावश्यक वस्तंूच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच भाजप सरकारच्या काळात राफेल विमान घोटाळा झाला असून जीएसटी, नोटबंदीसारखे चुकीचे निर्णय घेऊन सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. त्याच्या निषेधार्थ ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे.कोल्हापूरात बंदच्या नियोजनासाठी सकाळी १0 वाजता कॉँग्रेस कमिटी कार्यालयात शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सकाळी उपस्थिती लावली. यामध्ये जिल्हा, शहर, तालुका, युवक, महिला, एन. एस. यू. आय., सेवादल, ओबीसी ग्राहक सेलचे अध्यक्ष व पदाधिकाºयांचा समावेश होता.डाव्या पक्षांची निदर्शनेभाजप सरकारने केलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला डाव्या लोकशाही आघाडीने पाठिंबा दिला आहे. सकाळी नऊ वाजता बिंदू चौक येथे त्यांनी सरकारविरोधात निदर्शने केली.
यामध्ये ‘भाकप’चे नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, शेतकरी कामगार पक्षाचे बाबूराव कदम, संभाजी जगदाळे, ‘माकप’चे चंद्रकांत यादव, प्रा. सुभाष जाधव, जनता दलाचे शिवाजीराव परुळेकर, अॅड. अरुण सोनाळकर, वसंतराव पाटील, रवी जाधव, लाल निशाण पक्षाचे अतुल दिघे, आप्पा कुलकर्णी, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.शाळा, महाविद्यालयांत अघोषित बंदबंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध शाळाही बंद राहिल्या. महाविद्यालयातही तुरळक हजेरी होती. शाळेत विद्यार्थ्यांना सोडणाऱ्या रिक्षावाल्या मामांनीच वाहतूक बंद ठेवल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होती.उंटावरचे शहाणे...बिंदू चौकात डाव्या लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधार्थ निदर्शने केली. यावेळी आंदोलनात चक्क उंट आणून सरकारची उंटावरचे शहाणे अशी संभावना करत आगळ्यावेगळ्या पध्दतीने निषेध केला. आॅल इंडिया स्टुडंड फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत प्रतिकात्मक पध्दतीने उंटावर बसलेल्या या शहाण्यांची बिंदू चौक ते दसरा चौक मार्गावर मिरवणुक काढून आंदोलनाकडे लक्ष वेधून घेतले.