कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व भोगावती कारखान्याचे अध्यक्ष असलेले काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील हे बुधवारी स्वत:हून मुंबईतील ईडीच्या कार्यालयात सुनावणीसाठी हजर झाले परंतू त्यांची सुनावणी झाली नाही. त्यांना पुन्हा समन्स बजावून बोलवण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.जिल्हा बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत. ईडीने बँकेचीही चौकशी केली आहे. याचप्रकरणी बँकेने दिलेल्या कर्जाच्या माहितीबाबत चौकशी करण्यासाठी पाटील यांना मार्च महिन्यातच ईडीने नोटीस दिली होती. मात्र पी.एन.पाटील अचानक आज बुधवारी ईडीच्या कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहिले.गेल्या सोमवारी ईडीने आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील दादा बँकेतही चौकशी केल्याची चर्चा आहे. परंतू त्याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. जिल्हा बँकेच्या तीन माजी संचालकांचीही ईडीने गेल्या आठवड्यात चौकशी केली आहे.
काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील ईडी कार्यालयात, पण...; कोल्हापूर जिल्ह्यात उडाली एकच खळबळ
By विश्वास पाटील | Published: April 05, 2023 2:17 PM