शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

Kolhapur in corona :कोल्हापूर पोलिसांनी जपली माणुसकी*

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 7:11 PM

कोल्हापुरातील पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत भुकेमुळे बेशुद्ध पडलेल्या एका गवंडी काम करणाऱ्या तरुणाला खायला घालून घरी पोहोचवले आणि माणुसकीचे दर्शन घडवले.

ठळक मुद्देकोल्हापूर पोलिसांनी जपली माणुसकीभुकेने बेशुद्ध झालेल्या राहुलला जेवू घालून पोहचवले घरी

कोल्हापूर : सोशल डिस्टननसिंगचे पालन करत कोरोना विरुद्ध लढा द्या पण माणुसकी जिवंत ठेवा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूरपोलिसांनी एक उदाहरण घालून दिले. 

कोल्हापुरातील पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत भुकेमुळे बेशुद्ध पडलेल्या एका गवंडी काम करणाऱ्या तरुणाला खायला घालून घरी पोहोचवले आणि माणुसकीचे दर्शन घडवले.

कोल्हापूरातील कळंबा येथील महाराष्ट्र नगर, शिव पार्वती उद्यानासमोर बुधवार सकाळ पासून एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती. पण सध्या कोरोनाच्या धास्तीने कोणी त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचे धाडस करत नव्हते. मात्र ही घटना लक्षात येताच, मूळचे कोल्हापूरचे पण सध्या महावितरण मुंबई येथे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असणारे विश्वजीत भोसले आणि व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी यांनी याबाबत प्रशासनास कळवले.या घटनेची तात्काळ दखल घेत, डीवायएसपी प्रशांत अमृतकर व त्यांची टीम सदर ठिकाणी हजर झाली. मास्क व हॅन्ड ग्लोज घातलेल्या पोलिसांनी त्या व्यक्तीस शुद्धीवर आणले. त्याला ओआरएसचे पाणी दिले. यामुळे त्या व्यक्तीला थोडी तरतरी आली.

त्यानंतर त्या व्यक्तीने आपले नाव राहुल असे सांगितले. व आपले घर बालावदूत नगर, नाना पाटील नगर या परिसरात असल्याचे सांगितले.

तो भुकेला आहे हे लक्षात आल्यावर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरातून पोलिसांनी राहुलला देण्यासाठी चपाती भाजीचे ताट मागून घेतले व राहुलला खाण्यास दिले. जेवणानंतर एक रिक्षा करून राहुलला घरी पोहचवण्यात आले.राहुलची योग्य काळजी घेऊन त्याला घरी पोहचवण्यासाठी कळंबा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल आर.एन.बर्गे, होमगार्ड राहुल वरुटे, रोहित साठे, व्हाईट आर्मीचे रणजित गोहिरे , रवी भाले, सुधीर पटवणे यांनी विशेष प्रयत्न केले.लोकडॉऊन मुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे हाल होत आहेत. गवंडी काम करणाऱ्या राहुलकडे पाहिल्यानंतर त्याने दोन तीन दिवस काही खाल्ले नव्हते हे लगेच लक्षात येत होते.

आधी कर्तव्य मग कुटुंब

कर्तव्य बाजवताना स्वतःच्या जेवणाची हेळसांड होत असतानाही राहुलसाठी जेवणाचे ताट मागून घेणारे पोलीस माणूस म्हणून मोठे ठरतात. मदत करणाऱ्या एका कर्मचाऱ्यास आपल्या आजारी पत्नीला मेडिकल मधून गोळ्या पोहोचवायच्या होत्या. मात्र कर्तव्य बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यास त्याकरताही दिवसभर वेळ मिळाला नव्हता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस