कोल्हापूर : महे (ता. करवीर) येथील गणेश विसर्जनावेळी झालेल्या वादाचे पर्यावसान मंगळवारी (दि. २५) गावात उमटले. काठी व लोखंडी गजाने केलेल्या हल्लयात एक जण जखमी झाला. या प्रकरणी करवीर पोलिसांत परस्परविरोधी तक्रार बुधवारी (दि.२६)रात्री दाखल झाली आहे.नितीन राजाराम इंगवले याने दिलेल्या फिर्यादीनूसार संशयित बदाम जयसिंग पाटील, जयसिंग राजाराम पाटील व पांडूरंग पाटील व पांडूरंग बापू पाटील यांच्या फिर्यादीनूसार संशयित नितीन इंगवले, शुभम राजाराम इंगवले , अंकुश सदाशिव वाईंगडे व शहाजी सदाशिव वार्इंगडे (सर्व रा. महे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या मारहाणीत पांडूरंग पाटील हे जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पोलिसांनी सांगितले की,गणेश विसर्जनावेळी नितीन इंगवले व संशयित पांडूरंग पाटील यासह चौघा संशयितांमध्ये वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी मंगळवारी (दि.२५) गावातील बुद्धिराज पाटील यांच्या घरी नितीन इंगवले व पांडूरंग पाटील हे दोघे गेले. पण ;ते घरी नव्हते. त्यानंतर नितीन इंगवले हा घरी जात असताना संशयित बदाम पाटील, जयसिंग पाटील व पांडूरंग पाटील या तिघांनी काठीने त्याला मारहाण केली.दरम्यान, घटनेनंतर पांडूरंग पाटील (वय ४८) यांना शुभम इंगवलेने डोक्यात लोखंडी गज मारला तर नितीन, अंकुश व शहाजी वार्इंगडे या तिघांनी काठीने मारहाण केली. यात पांडूरंग पाटील जखमी झाले.याची नोंद पोलिसात झाली आहे.