ठळक मुद्देसाईंच्या पादुका दर्शनासाठी गर्दीबुधवारी दुपारनंतर शिर्डीला प्रस्थान
कोल्हापूर : आगमनाची आरती, फुलांचा सडा व पारंपारिक वाद्यांचा गजर, मध्यान्ह आरती, धुपारती अशा विविध धार्मिक उपक्रमांनी शिर्डी स्थित श्री साईंच्या पादुका मंगळवारी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. यानिमित्त शिवाजी स्टेडिअम येथे उभारण्यात आलेल्या साई दरबारमध्ये पादुका दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. बुधवारी दुपारनंतर पादुकांचे पुन्हा शिर्डीसाठी प्रस्थान होेणार आहे.
आगमनाची आरती, फुलांचा सडा, मध्यान्ह आरती, धुपारती अशा विविध धार्मिक उपक्रमांनी शिर्डी स्थित श्री साईंच्या पादुकाांचे मंगळवारी कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियम येथील साई दरबारमध्ये आगमन झाले. (छाया : आदित्य वेल्हाळ)श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांच्या सहयोगातून श्री साई सेवा मंडळ व दिलबहार तालीम मंडळाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पादुकांचे सोमवारी रात्री कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. मंगळवारी सकाळी दहा वाजता रविवार पेठेतील दिलबहार तालमीच्या श्री साई मंदिरात पादुकांचे आगमन झाले.
कोल्हापुरातील यावेळी भाविकांनी पादुका दर्शनाचा लाभ घेतला. (छाया : आदित्य वेल्हाळ)यावेळी महापौर शोभा बोंद्रे, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, उद्योजक गिरीष शहा, माजी महापौर रामभाऊ फाळके, तालमीचे अध्यक्ष विनायक फाळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.मंदिरात श्री साईंची आरती झाल्यानंतर मिरवणुकीने या पादुका साई दरबार येथे आणण्यात आल्या. साई दरबारला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. शिर्डीप्रमाणेच येथे धार्मिक विधी करण्यात आल्या. बारा वाजता मध्यान्ह आरती झाली. यानंतर भाविकांनी पादुका दर्शन घेण्यात सुरवात केली.
सायंकाळी सव्वा सहा वाजता श्रीं धुपारती व रात्री दहा वाजता शेजारती झाली. आज बुधवारी पहाटे काकड आरती होणार आहे. मध्यान्ह आरतीनंतर दुपारी दीड वाजता पादुकांचे पुन्हा शिर्डीसाठी प्रस्थान होणार आहे, तरी भाविकांनी पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन दिलबहार तालीम मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.